mahatma jyotiba phule introduction परिचय :
संपूर्ण नाव :- जोतीबा गोविंद गोऱ्हे ( फुले )
जन्म :- इ. स. १८२७
mahatma jyotiba phule Childhood बालपण :
mahatma jyotiba phule :- गोविंद व चिमणाबाई या बांधकाम करणाऱ्या दांपत्त्याचे हे सुपुत्र . ज्योतीबा रावांचे वाडवडील हे सातारा जिल्ह्यातील कटगुण गावचे गोऱ्हे पण बागकाम करणारे , फुलांचे हारतुरे , गजरे करणारे म्हणून लोक त्यांना फुले म्हणू लागले. ज्योतिबा नऊ – दहा महिन्यांचे असताना त्यांची आई देवाघरी गेली. या चिमण्या जीवाचा सांभाळ त्यांच्या वडिलांनी मोलमजुरी करणाऱ्या बायकांच्या मदतीने केला.
mahatma jyotiba phule Education शिक्षण :
सगुणाबाई क्षीरसागर या स्त्रीने ज्योतिबांवर मायेची पाखर घातली. गोविंद रावांची मानलेली बहीण. त्यांना कोणीही नव्हते. जॉन नावाच्या गोऱ्या अधिकाऱ्याच्या मुलांना संभाळायला जातांना ज्योतिरावांना घेऊन जात असत व त्यांचे ऐकून जोतिबा इंग्रजी भाषा शिकले. ज्योतिबांचे प्राथमिक शिक्षण एका गावठी शाळेत झाले. १८८३ साली मध्ये ते बुधवार वाड्यातील शाळेचे विद्यार्थी झाले.
फोरक्या मुलांना अन्न, वस्त्र, निवारा, पुरविणाऱ्या मिचेल नावाच्या व्यासंगी मिशनऱ्याच्या सहवासात फुले परिवार कृतार्थ झाला. मिचेल यांनी जोतिबांच्या पत्नी सावित्रीबाई यांना ट्रेड मिस्ट्रेस केले. ज्योतिबांनी धर्म त्याग न करता मिशनऱ्यांची मूल्यनिष्ठा पत्कारली.
mahatma jyotiba phule Social reformer समाजसुधारक जोतीबा :
जोतीबांनी आयुष्यभर भारतीय स्त्रिया , दलित , रंजल्या – गांजलेल्या पीडित लोकांची सेवा करण्याचे व्रत अंगीकारले. दीन दलितांच्या व्यथा वेदनांच्या निराकरणाचा मार्ग म्हणून त्यांनी विद्येची कास धरली . बुध्दी विकसित झाल्याशिवाय व्यक्तीला योग्य अयोग्य कळणार नाही. आणि कळल्याशिवाय माणूस कृतिशील होत नाही. अशा विचाराने जोतीबांनी आपल्या कार्याच्या प्रचारासाठी आपल्या पत्नीसह जीवन समर्पित केले होते.
अस्पृश्यांना गावात प्रवेश नव्हता व मुलींनी घराबाहेर पडणे मान्य नव्हते , अशा काळात फुल्यांनी मुलींसाठी भारतात प्रथम शाळा सुरू केली . स्त्रियांवरील अन्याय संपवण्यासाठी त्यांनी सतीप्रथा , बालविधवा केशवपन , बालविवाह अशा अनिष्ट रूढी परंपरांविरूध्द बंड पुकारले. त्या वेळी जोतीबांना पितृछत्र सोडून घराबाहेर पडावे लागले. सावित्रीबाई व त्यांना अनेक अडचणी आल्या पण त्यांचा निर्धार पक्का होता.
पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या दलितांना ज्योतीबांनी आपला पाण्याचा हौद वापरायला सांगितले. ज्योतीबा म्हणत, ” माणसाला जन्माने धर्म न मिळता त्याला तो स्वतः च्या बुद्धीने स्विकारता आला पाहिजे.

mahatma jyotiba phule लेखन :
आपल्या समाजसेवेच्या कार्य प्रचारासाठी जोतीबांनी आमरण लेखणी झिजवली. १८७३ मध्ये 'गुलामगिरी', १८८३ मध्ये 'शेतकऱ्याचा आसूड', १८८५ मध्ये 'इशारा', 'ब्राम्हणाचे कसब' ही पुस्तके, 'अखंड' हा काव्यसंग्रह व 'तृतिय रत्न' हे नाटक इ. ग्रंथ लिहिले. १८८५ मध्येच 'सत्सार १ व सत्सार २' यांना प्रसिद्धी मिळाली. १८८९ मध्ये 'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक लिहिताना जोतिबांना अर्धांगवायू झाला. तशा विकलांग अवस्थेतही त्यांनी पुस्तकाचे लिखाण पुर्ण केले.
जोतीबांनी काशीबाई नातु या ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेतले. अनेक बालविधवांचे ते आधारस्तंभ झाले. समाजकार्याला वाहून घेणाऱ्या जोतीबांनी ‘महात्मा’ या उपाधीने गौरविल्या गेले.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुस्तके :
पुस्तकांचे नाव | वर्षे |
गुलामगिरी | 1873 |
त्रितीय रत्न | 1855 |
नाटक , ग्रंथ लिहिले | 1885 |
शेतकऱ्याचा आसूड | 1883 |
सार्वजनिक सत्यधर्म | 1889 |
इशारा , ब्राम्हणाचे कसब | 1885 |
mahatma jyotiba phule Death मृत्यू :
अर्धांगवायूमुळे विकलांग झालेल्या या महात्म्याने २७ नोव्हेंबर १८९० च्या रात्री या जगाचा निरोप घेतला.