प्रस्तावना
Mi Aarsa Boltoy Nibandh In Marathi – मित्रांनो मी एक साधा आरसा आहे हे आपणा सर्वांना तर माहितीच आहे. आणि याच बरोबर हे देखील माहिती आहे कि मी प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील भूमिका बजावतो. तुम्ही दिवस भरातून माझ्या समोर तासंतास उभा राहतात. आणि माझं काम आहे कि प्रत्येकाला त्याच खरे रूप दाखवणं मी माणसाला त्याच्या स्वतः कडे पाहायला लावतो. माझ्या कडे काही बोली भाषा नसली तरीही माझ्यात जे प्रतिबिंब आहे. तेच काही लोकांना खूप काही सांगून जात. आणि या मुळेच मी तुम्हाला आज माझी गोष्ट सांगितली आहे.
माझी घडामोड आणि इथपरेंतचा प्रवास
माझा जन्म किंवा घडामोड हि अनेक कारखान्यात होती. आणि मी ज्या काचे पासून तयार होतो ती काच अगदी साधी असती तिलाच पाठीमागून अल्युमिनियम नाहीतर अजून चांदीचा एकदम पातळ असा थर लावला जातो. त्यामुळे काय होते कि अगोदर जे पारदर्शक आपल्याला दिसत ना ते दिसणं बंद होत. आणि मी जेव्हा पूर्णपणे तयार होईल का तेव्हा मला सुंदर पद्धतीने एका फ्रेममद्धे बसवतात. काही काही कापडांच्या दुकानांमध्ये हि बसवतात. माझ्या कामाची सुरुवात कधीपासून होते हे तुम्हाला माहितीये का चला तर मग आज मी तुम्हाला सांगतो. मला जेव्हा हि कुठे घरात किंवा बाथरुम मध्ये बसवता तेव्हा पासुन माझ्या कामाची सुरुवात होते.
माझ्या वेळेतील दैनंदिन काम
मी तुमच्या घरातील एक अशी वस्तू आहे कि मी हे दर्षवतो कि तुम्ही तुमच्या कोणत्याही वेळेत तुमचे खरे रूप काय आहे. माझ्या समोर तुमच्या घरातील सर्व सदस्य येतात आणि मग काही जण मेकअप करतात तर काही जण दाढी आणि याच बरोबर आपल्या घरातील जे शाळेत जातात आपले छोटे छोटे मूल ते स्वतः ला पाच ते दहा मिनिटं तरी त्यांचे खरे रूप माझ्यात बगतात.
आपल्या घरातील आई पण माझ्या समोर येऊन चेक करते कि साडी वेवस्तीत बसली का नाही पुरुष लोक हि चेक करतात कि हा शर्ट मला कसा दिसतोय म्हणजे कि मी प्रत्येकाच्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार आहे.
सत्य परस्थिती दाखवणारा मी
तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे कि मी कधीच कोणाला त्याचे खोटे रूप दाखवत नाही आणि खोटेही बोलत नाही माणूस कितीही सजला आणि कितीही साधाभोळा राहिला तरी पण मी त्याला जे आहे तेच दाखवतो. मी कोणतीही गोष्ट अगदी स्पष्ट व काटेकोरपणे दाखवतो. जर एखाद्याचा चेहरा किंवा एखाद्याचे केस विस्कटलेले असतील तर मी त्यांना ह्या गोष्टी स्पष्टपणे दाखवतो. म्हणून ते मला त्यांचा एक प्रामाणिक मित्र समजतात.
माणसांच्या मनातील गोष्टी मला लगेच जाणवतात
माझ्या समोर जेव्हा कोणी एखादी व्यक्ती उभा राहते तेव्हा मी फक्त तिचा चेहरा नाही बगत तर तिच्या मनातील गोष्टी समजून घेतो. व मनातील भावना हि आणि जेव्हा माणूस माझ्या समोर उभा राहतो तेव्हा मी त्याला पूर्ण पणे हिरावून घेतो. जेव्हा कोणी माझ्या समोर उभा राहतो तेव्हा मला लगेच समजत कि हा माणूस दु:खी आहे कि आनंदी म्हणजे कि मी दररोज सगळ्या माणसांच्या मनातील गोष्टी आणि प्रत्येकाच्या भावना यांचा अभ्यास करतो. आणि याच कारणामुळे मला माणसांचे आयुष्य कश्याप्रकारे झालाय हे लगेच समजत.
माझ्याकडून होणारी अपेक्षा
काही काही वेळेला लोक माझी काळजी पण नाही घेत माझ्यावर धूळ, डाग, व किती वेळा मी काही व्यक्तींकडून फुटतोही किंवा काही जण माझं काम झालं म्हणून मला घरातून फेकूनही देतात. त्या वेळेला माझ्या मनाला काय वाटत असेल हे त्यांना कोण सांगेल मी तर एक माणूस पण नाही नाहीतर मी सांगितलं असतं. मी एवढ्या चांगल्या पद्धतीने घरात राहतो मी कोणाला थोडाही त्रास देत नाही तरीही लोक माझ्यावर राग काढतात मला फोडतात आणि छोटे तुकडे करून मला फेकून दिले जाते म्हणजे कि लोक आपला वापर तो त्यांच काम होई परेंतच फक्त माझा अंत हा अचानकच होतो.
माझ्या सर्व वाचकांसाठी एक संदेश
सर्वांना एक महत्वाचा संदेश तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या डोक्यात चांगले विचार ठेवा. आणि मन निर्मळ ठेवा तुमचं बाहेरून जे सौंदर्य असत ते काही कामाचं नसत जेव्हा माणूस त्याचे मन चांगले ठेवतो तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने सुंदर दिसतो. त्यासाठी सर्वांनी दुसऱ्यांसाठी मन स्वछ ठेवा.
निष्कर्ष
तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे कि मला सार्वजणं आरसा म्हणून ओळखतात मी एकदम साधा, शांत , व प्रामाणिक आहे. आणि जो माझ्या समोर उभा राहतो मी त्याला त्याच खरं रूप दाखवतो. माझं काम खूप छोटं आहे पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे .





