My Best Friend Essay Marathi

My Best Friend Essay In Marathi – माझा परम मित्र निबंध मराठी

प्रस्तावना

My Best Friend Essay In Marathi – माणसाच्या जिवनामध्ये मैत्रीला खुप महत्व आहे. आपल्याकडून न काळात एखादी गोष्ट घडली तर आपण सगळ्यात पहिले कोणाला सांगतो मित्राला आणि आपला मित्र हा आपल्या प्रत्येक काळात सहभागी असतो. आणि आपले काही मित्र वाईट गोष्टींचं वेसण करत असतील तर आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आणि मित्र असे हि असतात कि जे आपल्यासाठी एवढं सगळं करतात मार्गदर्शन, सल्लागार, प्रेरणादायी अणखी योग्य दिशा दाखवतात ह्या सर्व गोष्टी जो मित्र आपल्या साठी करतो तोच खरा परम मित्र असतो.

मित्राची ओळख

माझा हि एक परम मित्र होता आणि त्याचे नाव होते सागर आणि आमच्यादोघांची लय कट्टर मैत्री आणि आमच्या दोघांचा आमच्या शाळेतील मुलं, मुली आणि शिक्षक खूप मान सन्मान करत असत. आणि आम्ही दोघे पहिली ते दहावी एकाच वर्गात आणि एकाच बाकावर बसायचो आणि आमची मैत्री खूप काळापासून टिकून आहे व इथून पुढेही राहणार. आणि माझा मित्र स्वभावाने खूप चांगला व मदतशील देखील आहे. आमच्या दोघांच्या बोलण्यात आदर, नम्रता, स्पष्टता आमचे हे संस्कार बघून शिक्षकांना खूप भारी वाटायचं. मला त्यातील प्रामाणिकपणा आणि चांगले गुण फार आवडतात.

मैत्रीची सुरुवात कशी झाली

आमच्या दोघांच्या मैत्रीची सुरुवात हि आमच्या शाळेतूनच झाली. आम्ही दोघे एका बाकावर बसायचो आणि मग आम्ही एका मेकाला ओळख विचारू लागलो आमचा संवाद वाढत गेला. तेव्हापासूनच आम्ही एक मेकांचे मित्र झालो. हळू हळू काही दिवसांनी आम्ही एक मेकांना समजून घेतलं म्हणजे कि स्वभाव, सवयी, विचार ह्या सर्व गोष्टी जाणून घेतल्या आणि मग यानंतर काही दिवसांनी आमची मैत्री अगदी घट्ट झाली.

अमुचा दोघांचा एकमेकांवरील विश्वास

मैत्री हि फक्त विश्वास या शब्दावर अवलंबून असते. मैत्रीत सर्वात महत्वाची गोष्ट हि विश्वास आहे. ज्या मित्रांचा एकमेकांवर शंभर टक्के विश्वास असतो तेच खरे आणि परम मित्र असतात. आणि मी आणि माझा जो मित्र होता त्याचा हि माझ्यावर खूप विश्वास होता व माझा हि त्यावर खूप विश्वास होता तो कोणतीही गोष्ट मला न सांगता करत नव्हता. आणि मी हि कोणती कामे त्याला न सांगितल्या करत नव्हतो. त्याच्या किव्वा माझ्या मनात कोणतीही गोष्ट असो आनंदाची किव्वा दुःखाची आम्ही ती एकमेकांना मुक्तपणे सांगतो. आणि माझं सर्व मित्रांना सांगणं आहे कि मैत्रीत एकमेकांवर विश्वास असेल तर ती जास्त काळ टिकते आणि तिलाच खरी मैत्री म्हणतात.

अभ्यासात एकमेकांना साथ देणे

अभ्यास हा कोणत्याही विषयाचा असो आणि त्यात कितीही अडचणी येउद्या आम्ही दोघे एकमेकांचा विषय सोडवणार परीक्षाच नियोजन हि खूप चांगल्या पद्धतीने करणार आम्ही दोघे आणि पेपर लिहून आल्यावर एकमेकांचे मार्क मोजणार आणि मग त्याच गोष्टीवर खूप वेळ चर्चा होणार. आम्ही शाळेत कोणत्याही गोष्टीच्या आधी शिस्तीचं खूप पालन करणार आणि आम्ही दोघांनी एक विचार आमच्या मनावर लिहून ठेवला होता कि अभ्यासात आपुन दोघांनीही पुढे जायचं आणि वर्गातील मित्रांनाही पुढे घेऊन जायचं.

तो आणि मी एकमेकांच्या आनंदातील व दुःखातील साथीदार

आपला जो खरा मित्र असतो त्याची ओळख आपल्याला वाईट काळातच होते. माझ्या वर खूप वाईट काळ आला पण तो न डगमगता माझ्या पाठीशी ठाम पणे उभा राहिला मला कुठल्या खेळात म्हणा किव्वा एखाद्या चित्रकला स्पर्धेत यश आलं कि तो हि नेहमी आनंदाने सहभागी होतो. आणि जर कुठल्या गोष्टीत मला अपयश आलं तर तो मला धीर देतो मी प्रत्येक गोष्टीत विजय मिळवावा यासाठी तो प्रयत्न करतो. आणि आम्ही दोघे एकमेकांसाठी कधीही आणि कोठेही उपलब्ध असतो.

आम्हा दोघांना असणारे छंद व चर्चा

शाळा व अभ्यास या बरोबरच आम्ही इतर हि काही छंद अंगीकारत होतो. आम्हाला अनेक प्रकारचे छंद होते जसे कि वाचन, लेखन, खेळणे आणि याच बरोबर आम्हाला निसर्गभ्रमण करायला खूप आवडायचे ह्या सर्व गोष्टींची मजा फक्त शाळेच्या वेळेतच करता येते. आणि जेव्हा शाळा सोडून जातो तेव्हा आपल्याला शाळेची खूप खंत व शाळेची आठवण येते. आणि मी व माझा मित्र जेव्हा शाळेत होतो त्यावेळी आम्ही खूप वेगवेगळी माहिती घेत असत व आम्ही आमच्या पुढील काळातील भविष्यावर खूप चर्चा करत असत पण ज्या दिवशी शाळेला सुट्टी असणार त्यादिवशी मन अगदी असं उदास होणार असं वाटत कि कधी सोमवार चा दिवस उगवतो.

माझ्या मित्रांकडून मला मिळणारी प्रेरणा

मला माझ्या शाळेच्या वेळेत जेवढे मित्र भेटले त्यात काही वाईट होते व चांगले पण जे वाईट होते का मी व माझा एक परम मित्र आम्ही त्यांना योग्य मार्ग निवडण्यास प्रेरित करत असत व तेही एकच दिवस नव्हे तर रोज रोज आम्ही दोघे त्यांना समजावून सांगत असत कि वाईट बोलू नका वाईट गोष्टी करू नका पण कोणीही आमची गोष्ट समजून घेतली नाही. आणि माझा मित्र आणि मी एकमेकांना चुकांमधून शिकण्याची शिकवण देतो.

निष्कर्ष : मैत्रीचं नातं हे अमूल्य असत

शेवट मी असे म्हणू शकतो कि माझा मित्र माझ्या आयुष्यातील एक अमूल्य व्यक्ती आहे. मी व माझे आयुष्य त्याच्याशिवाय अपूर्ण आहे. माझं एवढं पुढे जाण्याच कारण फक्त तोच आहे कारण तो मला साथ, विश्वास, प्रेरणा व आत्मविश्वास देतो. आणि माझं सर्वांना एक सांगणं आहे कि असा एक मित्र आपल्याकडे असेल तर त्याला आयुष्यभर आपला भाऊ म्हणून जपा आणि मी पण माझ्या परम मित्राला मनापासून धन्यवाद करतो.

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.