Rajmata Jijau Essay In Marathi

Rajmata Jijau Essay In Marathi – राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त चांगली प्रेरणा देणारा मराठी निबंध

प्रस्तावना

Rajmata Jijau Essay In Marathi – या भारताच्या इतिहासात अनेक राजे आणि थोर व्यक्ती होऊन गेले. राजमाता जिजाऊ यांनी एका चांगल्या पुरुषाला घडवले. आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना लहानपानापासूनच सगळी शिकवण देण्यास सुरुवात झाली. त्यांना अनेक गोष्टी सांगितल्या राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी राज्यांना अतिशय चांगले संस्कार लावले.

जिजाऊ यांचा जन्म बालपण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे जन्म ठिकाण सिंदखेड हे होते व जिल्हा बुलढाणा हा होता. आणि याच बरोबर त्यांचे वडील हे एक निजामशाहीमधील एक पराक्रमी सरदार होते. आणि त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधवराव हे होते. यांनी बालपणातच खूप काही गोष्टी आत्मसात केल्या वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान त्यांनी घेतले जस कि शत्रूंशी युद्ध , समाजसेवा , राजकारण , समाजवेवस्था इत्यादी.

कुटुंब व विवाह जीवन

छत्रपती शहाजीराजे भोसले हे खूप पराक्रमी व्यक्ती होते. आणि राजमाता जिजाऊ यांचा विवाह शहाजीराजे यांच्याशी झाला. त्यांचा विवाह झाल्यानंतर सतत युद्ध चालू असायचे. आणि याच बरोबर त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांनी खूप मोठा संघर्ष केला. खुप काही अडचणींना सामोरे जावे लागले. ह्या अश्या भयानक परिस्थिती मध्ये त्यांनी त्यांच्या जीवनाचा गाडा ओढला. त्यांच्यावर कितीही बिकट परिस्थिती अली तरीही त्यांनी संयम आणि धैर्य दाखवले.

मातृत्व आणि शिवसंस्कार

19 फेब्रुवारी 1630 या तारखेला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. ती वेळ तो काळ अतिशय भयानक असा होता. त्या काळा मध्ये आदिलशाही आणि निजामशाही व याच बरोबर मुघल यांच्या मध्ये सतत संघर्ष चालू राहायचे. तो काळ खरंच अशांत असा होता. आणि अश्या भयानक काळात राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी राज्यांना जन्म देऊन त्यांचे पालन पोषण करून त्यांना घडवले. शिवाजी महाराज यांचे पूर्ण बालपण आणि तरुणपण हे जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली गेले.

जिजाऊ यांनी शिवाजी राजांना खूप भारी संस्कार लावले. जिजाऊ ह्या शिवाजी राज्यांच्या बालपणापासूनच त्यांच्याशी चांगल्या गप्पा गोष्टी बोलत असे. आणि माणसाला अनुभव हा बोलण्यातून नाही तर त्याच्या बरोबर ती गोष्ट घडल्यानंतरच येत असतो.

जिजाऊंचे संस्कार

जिजाऊ ह्या अतिशय हुशार होत्या त्यांनी त्यांच्या बोलीभाषेतूनच शिवाजी राजे यांना संस्कार लावले. त्यांचे बोलणेही वेगळे काही नव्हते ते गप्पा मारायच्या रामायण महाभारताच्या कथा, संतांचे विचार , व स्त्रियांचा सन्मान इत्यादी. या सर्व गोष्टींवर त्यांच्या गप्पा रंगत असे. जिजाऊ यांनी शिवाजी राज्यांना बालपणापासूनच चांगले संस्कार लावले यामुळेच त्यांचे एवढे मोठे व्यक्तिमत्त्व घडले.

स्वराज्याची प्रेरणा

त्या काळात म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात परकीय जी सत्ता होती तिचे वर्चस्व व राज्य होते. आणि ह्या अश्या गोष्टींमुळेच आपल्या भारत देशात अन्याय, अत्याचार, लूटमार ह्या अश्या गोष्टी घडत असे. आणि हे सर्व जिजाऊ यांच्या काना पर्यंत आल्याशिवाय राहत नव्हतं आणि ह्या गोष्टी ऐकून जिजाऊ त्यांचे मन अस्वस्थ होत असे. आणि मग त्याच वेळी जिजाऊ यांनी एक निर्णय घेतला आणि तो म्हणजे त्यांनी शिवाजी राज्यांना हे सांगितले कि स्वराज्याचे काम आपण हाती घेतले पाहिजे.

स्वराज्य कारभाराच्या राजमाता म्हणून भूमिका

जिजाऊ ह्या शिवाजी महाराजांच्या आई होत्या आणि स्वराज्याचा पूर्ण राज्यकारभार त्यांच्या हाती होता. राजमाता जिजाऊ ह्याच पूर्ण स्वराज्याचा राज्यकारभार बगणार म्हणजे कि संपूर्ण गोष्टीच मार्गदर्शन करणार त्यांचे प्रत्येक गोष्टींकडे बारकाईने लक्ष होते. व त्यांना जी जबाबदारी मिळाली आहे त्या ती अतिशय काटेकोर पणे पाळत होत्या.

निष्कर्ष

राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्यासाठी खूप मोठी प्रेरणा होत्या. त्यांनी अनेक गोष्टींचे स्मरण त्यांच्या अंगी कारले होते. त्याग, ध्येय, संस्कार त्यांनी फक्त भारत देशासाठी इतिहास घडवला नाही तर इतिहासाला एक नवीन दिशा दिली. व राजमाता जिजाऊ यांच्याच संस्कारातून एक महान राजा जन्माला आला शिवाजी महाराजांनी खूप मोठं काम आपल्या भारत देश्यासाठी केलेल आहे.

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.