my village essay in marathi

My Village Essay In Marathi – माझ गाव मराठी निबंध

प्रस्तावना

my village essay in marathi आपल्या भारत देशाला खेड्यापाड्यांचा देश म्हणून ओळखतात. आपल्या देशाची ओळख हि गावांमद्धे व खेड्यांमद्धेच आहे. आणि गावातील लोक हे खूप साधे भोळे असतात. त्यांच्यातली ती माणुसकी तो शांतपणा आणि त्यांचं ते गोड बोलणं हे मला फार आवडतं. आपले गाव म्हणजे आपल्या आयुष्याचे एक अविभाज्य भाग आहे. आपल्या गावासारखं सुख शहरात तर अजिबात नाही भेटू शकत.

माझ्या गावाचे नाव हे अंमळनेर आहे. व माझे गाव नेवासा तालुक्यातील असून माझे गाव अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. आमच्या गावाकडं नदी आहे. व आमच्या शेतात विहीर आहे. गावाकडं आल्यावर तुम्हाला दोन गोष्टींचा संगम अनुभवायला मिळेल ते म्हणजे निसर्ग व माणुसकी.

माझ्या गावाचे वातावरण व वेवस्था

आमच्या गावाची सर्वात भारी वैशिष्ट्ये कोणते आहे तर ते म्हणजे गावातील वातावरण घनदाट झाडे शेती नदी संपूर्ण गावात हिरवेगार झाडे झुडपे अन त्या झाडांवर बसलेले पक्षी आणि ते त्यांच्या आवाजांचा किलबिलाट करतात. व हिवाळ्याच्या दिवसात धुक्यांची ती निसर्ग रंम्य सकाळ गावाकडं सकाळी सकाळी खूप प्रसंन्न वाटतं.

गावाकडं असल्यावर प्रत्येकजण आपल्या शेतात किंवा घराभोवती खूप छान छान झाडे लावतात. ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे ते लोक फळांचे हि झाडे लावतात. पण ज्यांच्याकडे फक्त आहे थोडीफार जागा तर ते लोक फुलांचे झाडे आपल्या दारासमोर लावतात.

माझ्या गावातले लोक आणि त्यांचे जीवन कसे असते आपण पाहूया

आमच्या गावातले लोक अतिशय शांत प्रेमळ दररोज शेतात काम करणारे अशे लोक असतात गावाकडं हा पण एवढं मात्र खरं हे कि शहरात कोणीच कोणाला मदत करत नाही पण गावाकडील लोक एकमेकांशी बोलतात एकमेकांना काही अडचणीत मदत करतात. गावात कोणावरही काहीही संकट आलं तरीही सर्वजण त्यांच्या मदतीला धावून जातात. आस आहेका शहरात सांगा बरं तुम्ही मला शहरातील लोक एकमेकांन सोबत बोलतं पण नाही तर एकमेकांच्या घरी जाण तर खूप लांबची गोष्ट आहे.

गावातील लोकांचे व गावचे खूप सारे वैशिष्ट्ये आहेत. पण खरं वैशिष्ट्ये म्हणजे गावातील लोकांची एकजूट. आणि गावातील बहुतेक लोक हे शेतीच करतात. शेतीतून पिके उत्पादन करतात. आणि ते विकून त्यातून जेवढे पैसे येतील त्यात आपले घर चालवतात.

माझ्या गावातील लोकांचे कार्य

आपण सर्वांना तर माहितीच आहे. कि गावातील लोकांचे व्यवसाय हा शेतीच असतो. व गावातील लोक हे शिक्षणाला जास्त मनावर नाही घेत. पण जो शिक्षण करायचं हि गोष्ट मनावर घेतो तो त्याच्या स्वप्नांपरेंत नक्कीच पोहचतो. पावसाळ्यात हिरवगार शेत बगुन मन खूप प्रसंन्न होते. तसेच काही काही शेतकरी फळांच्या झाडांची बागायती शेती हि मोठ्या प्रमाणात करू राहिलेत.

गावातील लोक हे कष्टपूर्वक जीवन जगतात. गावातील लोक हे कोणताही व्यवसाय करायला अजिबात लाजत नाहीत. आणि रोज रोज असाच व्यवसाय करून गावातील लोकांना त्यांचं पोट भरण्याइतकं उत्पन्न मिळते.

माझ्या गावातील शिक्षण सुविधा

आमच्या गावात फक्त प्राथमिक शाळा आहे. व येथे मुलांना व मुलींना चांगले शिक्षण दिले जाते. आणि आमच्या गावच्या शाळेत खूप सारे उपक्रम राबवले जातात. मुलांना ज्ञान व संस्कार दोन्ही चांगले लावले जाते. आणि शाळेत मुलांच्या क्रिडास्पर्धा, व सांस्कृतिक कार्यक्रम व सर्व मुलांचे जन्मदिन आणि राष्ट्रीय सण उत्सव साजरे केले जातात. आणि आमच्या गावातील शाळेतील शिक्षक अतिशय छान शिकवतात असं मुलं घरी आल्यावर त्यांच्या आई बाबांना सांगतात. आणि शिक्षक लोक मुलांना एकदम हसून खेळून शिकवतात असंही मुलं घरी सांगतात. म्हणजे मुलांना जी शाळा आवडेल त्याचं शाळेत त्यांचा प्रवेश निश्चित करा आणि आपल्या मुलांचे भविष्य उज्वल करा.

माझ्या गावातील धार्मिक स्थळे

आमच्या गावात खूप सारे मंदिरे आहेत. पण त्यापैकी एक मंदिर हे प्राचीन काळापासून आहे. आणि त्याच नाव आहे श्री स्वयंभू महादेव देवस्थान ( त्रिवेणीश्वर ) हे मंदिर खूप प्रसिद्ध हि आहे. तेथे महाशिवरात्रीला लाखो ने भक्त येतात दर्शनासाठी तसेच गावात आणखी काही मंदिरे आहेत संकट मोचन हनुमान मंदिर , विठ्ठल रखुमाई , खंडोबा, महालक्ष्मी , व मांगीरबाबा असे अनेक मंदिरे गावात आहेत. आणि गावातील लोक हि मंदिरात जाऊन पूजा करत असतात. आणि गावामद्धे सण उत्सव खूप आनंदाने साजरे केले जातात. व ते सण कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन करत असतात. आणि गावाचा विकास हि चांगल्या प्रकारे आहे पण गावातील लोक हे साधेपणा आणि शांतता नेहमीच टिकून ठेवतात.

माझ्या व माझ्या मित्र-मैत्रिणींचा बालपणीचा आठवणी

आम्हाला जेव्हाही सुट्टी राहायची तेव्हा आम्ही सर्वजण मित्र मैत्रिणींनी एका जागेवरती येण्याचं ठरवलं ज्या दिवशी आमच्या शाळेला सुट्टी राहायची त्या दिवशी आम्ही सर्वजण एकत्र येऊन खूप मजा करायचो आम्ही सर्वजण मित्र नदीत पोहायला जायचो नाहीतर कुठे झाडावरती नाहीतर कोणाच्याही शेतात उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये मामाच्या गावाकडे जाणे आजी आजोबांसोबत शेतात जाऊन आंब्याच्या झाडाचे आंबे तोडणे व रात्री आजी आजोबांसोबत बाहेर अंगणात मस्त मध्ये ढगात चांदण्या बगत पडणे हे असे होते आमचे बालपण.

आपण पाहूयात गावाचे महत्त्व

गाव म्हणजे काय आहे हे माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो गाव म्हणजे संस्कृती माणुसकी प्रेम आपुलकी भावना सहकार्य एकमेकांशी चांगले बोलणे मी आत्ता सुट्टी मध्ये फक्त एक हप्ता माझ्या मामासोबत शहरांमध्ये राहण्यास गेलो तर तिथे मला गावासारखं सुख आणि शांतता अजिबात मिळाली नाही. आणि ह्या गोष्टी शहरांपेक्षा गावांमध्ये चांगल्या प्रकारे अनुभवायला मिळतात.

निष्कर्ष

माझे गाव हे माझ्या काळजाचा तुकडा आहे. मी आपल्या भारत देश्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलो तरीही मला माझ्या गावाची ओढ हि कायमच राहील माझे गाव खूप छान आहे. मला माझ्या गावचा खूप अभिमान वाटतो. आपल्या गावातील माणसं , संस्कृती , सुंदरता , व आणखी बरच काही म्हणून सर्वांनी आज पासून आपल्या गावाचा अभिमान हा ठेवलाच पाहिजे.

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.