26 January Republic Day Marathi Nibandh

Republic Day Marathi Essay 2026 – प्रजासत्ताक दिन मराठी निबंध

प्रस्तावना

आपला भारत देश हा विविध कार्यात एकता जपणारा आहे. आपण 26 जानेवारी हा दिवस दरवर्षी साजरा करतो. हा दिवस भारत देश्याच्या इतिहासातील गौरवशाली दिन आहे. कारण या मुळे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले. आणि मग तेव्हापासूनच भारत देश हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक म्हणून ओळखला गेला.

प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व

आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळाले पण स्वातंत्रझाल्यानंतर भारत देश चालविण्यासाठी एक प्रभावी संविधान पाहिजे होते. या कारणामुळे संविधान सभा स्थापित करण्यात आली. आणि सभेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांनी अनेक देश्यांचे संविधान पहिले व याच बरोबर त्यांचा पुरे पूर अभ्यास देखील केला आणि मग आपल्या भारत देशासाठी एक आदर्श संविधान तयार केले.

26 जानेवारी हा दिवस निवडण्याचे कारण आहे कि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वराज्याचा झालेला एक ठाराव स्विकारला होता. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निवडण्यात आला होता.

भारतीय संविधानाचे महत्त्व

Republic Day Marathi Essay 2026 – आपले भारतीय संविधान हे जगात सर्वात मोठे आणि लिखित आहे. त्यामध्ये सर्व गोष्टींची रचना स्पष्टपणे मांडलेली आहे. जसे कि मूलभूत हक्क राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे इत्यादी. आपल्या भारतीय संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळतात. या बरोबर कोणताही भेदभाव न करता प्रत्येक स्त्री आणि पुरुष यांना सामान न्याय मिळतो.

आणि संविधान हे पुस्तक फक्त एका जाती धर्माचा विचार करून न लिहिता ते पुस्तक सर्व जातीच्या बांधवांना एकत्र घेऊन सर्वांचा विचार घेऊन लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक आपल्या भारत देशाच्या लोकशाहीतील जे मूल्य आहे का त्याचे प्रतिबिंब आहे.

प्रजासत्ताक दिनाचे सोहळे

प्रजासत्ताक दिनाचा जो मुख्य कार्यक्रम असतो तो नवी दिल्ली मध्ये कर्तव्यपथ व राजपथ येथे या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं जात. व या दिवशी ध्वजारोहण करणारे प्रमुख पाहुणे हे आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती असतात. ध्वजारोहण झाल्या नंतर मग लगेच राष्ट्रगीत होत मग त्रिसेना परेड सुरु होते. आणि यातून आपल्या भारताची शिस्त, कार्य, ताकद हे सर्व आपल्याला परेडच्या माध्यमातून दाखवले जाते.

शाळा, महाविद्यालये आणि समाजातील उत्सव

सरकारी कार्यालय शाळा महाविद्यालय अश्या संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात आणि उत्सहात साजरा केला जातो. शाळेतील आणि महाविद्यालयातील छोटं छोटे विद्यार्थी त्यांच्या राष्ट्रगीत व भाषणातून आणि याच बरोबर देशभक्तीपर गीते विद्यार्थी हे सर्व सादर करून देशाविषयी आपली भावना व्यक्त करतात. या सर्व कार्यक्रमातून मुलांमध्ये जबाबदारी व राष्ट्रीय एकात्मता याची भावना वाढते.

देशातील नागरिकांची जबाबदारी

Republic Day Marathi Essay 2026 – 26 जानेवारी व 15 ऑगस्ट हा दिवस आपल्याला फक्त हक्कांची आठवण करून नाही देत तर हे दिवस आपल्याला आपले कर्तव्य काय आहे. आपण या भारत देशासाठी काहितरी चांगलं काम केलं पाहिजे याची जाणीव करून देतात. प्रत्येक भारतीयांची काही ना काही जबाबदारी असते आणि आपण तिचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे.

देशातील कायद्यांचे पालन आणि आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवणे. आजच्या काळातील तरुण वर्गाने जर देशासाठी काहितरी चांगले कार्य केले तर आपला भारत देश आणखी सक्षम आणि समृद्ध होईल.

प्रजासत्ताक दिनाचे संदेश

26 जानेवारी व 15 ऑगस्ट हे दोन दिवस आपल्याला काही मूल्यांची आठवण करून देतात. आणि ते म्हणजे स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या दिवसात आपण एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी काम केले पाहिजे. आणि आपल्या भारत देशाची खरी ओळख हि एकता आहे. आणि ती इथून पुढल्या तरुणं वर्गाने जपली पाहिजे हे खूप महत्वाचे आहे.

प्रजासत्ताक दिनाचे संदेश

Republic Day Marathi Essay 2026 – 26 जानेवारी व 15 ऑगस्ट हे दोन दिवस आपल्याला काही मूल्यांची आठवण करून देतात. आणि ते म्हणजे स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या दिवसात आपण एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी काम केले पाहिजे. आणि आपल्या भारत देशाची खरी ओळख हि एकता आहे. आणि ती इथून पुढल्या तरुणं वर्गाने जपली पाहिजे हे खूप महत्वाचे आहे. भारत देशातील सर्व नागरिकांना संविधानामध्ये जे हक्क आणि कर्तव्य मिळाले आहेत ते आपण सर्व जण एकत्र येऊन जपूया आणि आपण ज्या संविधानामुळे नागरिक झालो आहोत त्याचा सन्मान राखुया.

निष्कर्ष

सर्व भारतीयांसाठी 26 जानेवारी व 15 ऑगस्ट हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. हे दिवस आपल्याला काही गोष्टींची आठवण करून देतात ते म्हणजे कि आपले भारतीय सैनिक जे सिमेवरती आपल्या संरक्षणासाठी डोळ्यात तेल घालून रात्र न बगता आणि दिवस न बगता उभे आहेत. आपण सर्वांनी देशाच्या विकासाकडे लक्ष द्यावे. व आपल्यामुळे आपल्या भारत देशाची प्रगती झाली पाहिजे असा संकल्प करावा.

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.