प्रस्तावना
Mobile Nasta Tar Marathi Nibandh – आताच्या काळामध्ये मोबाइलला हा आपल्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे. सकाळी उठलो कि आपण लगेच आपला मोबाइल घेऊन बसतो. मग आपण थेट रात्री झोपेपरेंत मोबाइल पाहतो. आणि आजचा काळ हा आसा झाला आहे कि कोणतीही गोष्ट हि मोबाइल शिवाय होत नाही. पण मला असं वाटत कि आपण एक दोन दिवस कल्पना करून पाहावी कि आताच्या घडीला आपल्याकड मोबाईलच नसता तर मग लोकांनी काय केलं असत. मग आता काहींना विचार आला असेल हि कल्पना करणे खूप अवघड आहे. परंतु तीच कल्पना आपल्या जीवनाचे मूल्य समजावून देते.
संवाद करण्याची पद्धत
आजचा काळ आसा आहे ना कि कोणताही व्यक्ती मोबाइलला सोडून एक मिनिट पण नाही राहू शकत. आणि याच बरोबर जर कोणाकडे मोबाइल नास्ता तर लोकांमद्धे संवाद हा खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. आणि आता मोबाइल मुळे आस झालंय कि आपण एका क्षणात कोणाशीही फोने करून बोलू शकतो, मेसेज वर आपण बोलू शकतो, व्हिडिओ कॉल वर आपण बोलू शकतो. मोबाइल मद्धे अशे खूप साधनं आहेत कि त्याच्याद्वारे आपण आपले पूर्ण कामे घरी बसल्या बसल्या करू शकतो.
आताच्या काळातील शिक्षण पद्धतीमधील बदल
हा मोबाइल जर नासता तर मुलांच्या ज्ञानात आणि शिक्षणात खूप मोठा बदल झाला असता. पण आता तस नाही राहील मुलांना आताच्या घडीला छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाइल हा पाहिजे आहे. आणि काही काही असेही मुलं आहेत कि ज्यांना दहावी या वर्गात येऊ परेंत आपलं स्वत:च नाव पण लिहिता येत नाही एवढी अवघड परिस्थिती आहे मुलांची त्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर लक्ष देणं खुप गरजेचं आहे.
आणि मोबाइल नसता तर एवढाच फरक झाला असता कि मुलांनी पुस्तक वाचून व मन लावून चांगला अभ्यास केला असता आणि त्यांच्या बुद्धीच्या जोरावर ते पुढे गेले असते दहावी हे वर्ष पूर्ण होई तो परेंत कोणत्याही आई वडिलांनी मुलांचा लाड करू नये व त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला लावावे.
मोबाइलचे वाईट परिणाम
मोबाईलने मुलांच्या बुद्धीवर खूप वाईट परिणाम होतात. मुलांचं अभ्यासावर लक्ष लागत नाही. मोबाईल असल्यामुळे मूल बाहेर मैदानावर खेळ खेळायला जात नाहीत. शाळेतून आल्यावर फक्त तो मोबाईलच घेऊन बसतात. आणि एकदा मोबाईल घेऊन बसले कि मग कोणाशीच बोलणार नाहीत फक्त त्यांचा मोबाईल आणि ते जर मुलांना मोबईल दिला नासता तर मग ते मैदानावर जाऊन खेळण्यात वेळ घालवला असता, आणि या बरोबर त्यांचं बालपण अधिक आनंदी आणि निरोगी झाले असते.
समाजातील नातेसंबंध
हा मोबाईल जर नासता तर समाजातील नाते हे आणखी घट्ट झाले असते व जास्तीत जास्त काळ टिकूनही राहिले असते. ह्या मोबाईल ने लोकांचा प्रत्यक्ष संबंध आणि संवाद हा कमी झाला आहे. आणि हा मोबाइल जर नासता तर लोक हे एकमेकांना भेटून बोलले असते. एकमेकांना समजावून घेतले असते. आणि नात्यातील एकोपाई पणा आणखी जास्त वाढला असता.
मोबाईल ने माणसांच्या आरोग्यावर होणारे परिणाम
मोबाइल हा एक अशी गोष्ट आहे कि ज्याने मानव जातीला काही समजेना मोबाइलने माणूस हा भरकटत चाललाय मोबाइलने माणसाचे घरांमध्ये हि संवाद कमी झाले आहे. खूप लहान वयात विध्यार्थ्यांना त्यांच्या डोळ्याने फळ्यावर शिक्षकांनी काय लिहिलंय हे दिसत नाहीये म्हणजे हि आताच्या पिढीसाठी खूप दुर्दव्याची बाब आहे.
मोबाइल आणि वेळेचे महत्व
लोकांकडे मोबाइल नेट ह्या गोष्टी नसत्या तर लोकांना वेळेची जाणीव राहिली असती व वेळेचे महत्व कळाले असते. आणि ह्या मोबाइल मुळे लोक वेळेचा योग्य वापरही करत नाही. काही काही विद्यार्थी अभ्यास करण्याच्या नावाखाली मोबाइल घेतात व तास तास वेळ त्या सोशल मीडिया आणि गेम्समध्ये वेळ वाया घालवतात. आणि हा मोबाईल नसता तर किती चांगलं झालं असत कारण मुलांनी तो वेळ त्यांच्या वाचनासाठी व खेळासाठी दिला असता. आणि या मुळे घरातील मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोबाइल हा नसता तर मुलांनी मन लावून अभ्यास केला असता. मोबाइल मुले मुलांना अभ्यास करणं हि खूप सोप्प झालंय.
तंत्रज्ञानाची कमतरता
हा मोबाइल जर नसता तर तंत्रज्ञानाची प्रगती हि खूप काही प्रमाणात मर्यादित राहिली असती. पण याच बरोबर मोबाईलने जग खूप पुढे गेले आहे. मोबाइल मुळे कोणतेही काम अगदी सोप्पे झाले आहे. आजच्या काळात मुलांना कोणतीही माहिती पाहिजे असेल तर लोक मोबाईल वर सर्च करतात. आणि लगेच एका मिनिट मध्ये पूर्ण माहिती आपल्या डोळ्यांसमोर येते.
निष्कर्ष
एवढं खरं हे कि जर मोबाईल हा नसता तर आपले जीवन हे थोडे वेगळे आणि कठीण झाले असते. आणि त्यात खूप सकारात्मक गोष्टीही झाल्या असत्या. मोबाइल पाहिजे होता पण छोटा पाहिजे होता. आणि या मोबाइल मुळे लोकांना काम ही करू वाटत नाही. त्यामुळे मोबाईलचा वापर करताना आपण त्याचे फायदा करून घेतला पाहिजे. आणि मोबाईलचा अति वापर करणेही फार चुकीचं आहे. व तो मोबाइल सर्वांनी पाहिजे तेवढ्याच प्रमाणात वापरावा व त्यातून चांगली गोष्ट शिकावी.





