Natal Nibandh in Marathi -

Natal Nibandh in Marathi – नाताळ मराठी निबंध

प्रस्तावना

Natal Nibandh in Marathi – नाताळ हा सण पूर्ण जगभर साजरा केला जातो. व हा सण अत्यंत आनंददायी व पवित्र आहे. आणि हा सण सर्वजण दरवर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा करतात. व नाताळ हा सण प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. आणि हा सण ख्रिश्चन धर्मीयांचा खूप प्रमुख सण मानला जातो. हा सण त्याच बरोबर प्रेम, शांती, बंधुता, क्षमा व मानवतेचा संदेश देणारा हा सण आपल्या समाजात एक अनोखी प्रमुख ऊर्जा निर्माण करतो.

प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म

आता आपण बगणार अहो कि प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम या एका गावात व एका गोठ्यात झाला आहे. आणि त्यांच्या वडिलांचे नाव जोसेफ व आईचे नाव माता मेरी असे होते. आणि ते दोन व्यक्ती अत्यंत साधे व धर्मनिष्ठ होते. व काही समाज असेही मानतो कि प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म मानवजातीच्या कल्याणासाठी झाला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रेम, करुणा, सत्य, त्याग व क्षमाशीलतेचा उपदेश केला. व त्यांचा एक संदेश होता कि “शेजाऱ्यावर प्रेम करा” त्यांनी हा जो संदेश संपूर्ण जगाला दिला तो आजही समाजाला मार्गदशन करतो.

नाताळ साजरा करण्याची तयारी

नाताळ सण साजरी करण्याची तयारी पंधरा दिवस ते एक महिना अगोदरच सुरु होते. लोक आप आपल्या घराची स्वच्छता करतात मग घर चांगले सजवतात नवीन कपडे खरेदी करून आणतात नाताळाच्या आगोदर चार ते पाच आठवडे ‘अ‍ॅडव्हेंट’ असे ओळखले जातात. या काळामध्ये काही लोक आत्मचिंतन व प्रार्थना आणि सेवाभाव या गोष्टींवर जास्त भर देतात.

नाताळ वृक्ष आणि सजावट

तर आपल्याला सर्वांना तर माहिती आहे कि नाताळ सणाची ओळख म्हणजे नाताळ वृक्ष आणि आपण हा वृक्ष रंगीबेरंगी शोभेच्या वस्तूंनी सजवलेला असतो. जसे कि दिवे, तारे, घंटा, खेळणी नाताळचा वृक्ष हा जीवन व आशा आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. नाताळ या सणाला घर, शाळा, चर्च, मॉल्स व अजूनही सार्वजनिक ठिकाणी आकर्षक पणे सजावट केली जाते. आणि नाताळाच्या उत्साहात प्रकाशझोतात न्हालेली शहरे पाहून तर अजुनचं आनंद होतो.

सांता क्लॉजचे महत्त्व

Natal Nibandh in Marathi – नाताळ म्हणलं कि सर्व छोट छोट्या मुल्लांना सांता क्लॉज आठवतो. त्याचे ते लाल कपडे, पांढरी दाढी, आनंदी चेहरा सांता क्लॉज हा सर्व मुलांचा लाडका व मित्र देखील आहे. तो सर्व लहान लहान मुलांना गिफ्ट्स व भेटवस्तू देतो. अशी समजूत प्रत्येक मुलाची आहे. सांता क्लॉज हा खूप दानशूर आहे आणि आनंद वाटण्याचे प्रतीक देखील आहे. प्रत्येक मुलांमध्ये चांगले वागण्याची सवय लागावी म्हणूनच सांता क्लॉजची कल्पना उपयुक्त ठरते.

नाताळचे खाद्यपदार्थ

नाताळ या सणामध्ये खाद्यपदार्थांना खूप महत्व असते. व नाताळ सणाला खूप चांगले पदार्थ बनवले जातात. त्यात मग केक, कुकीज, चॉकलेट्स, पाय, पुडिंग, मिठाया व अजून खूप पारंपरिक पदार्थ बनवले जातात. नाताळ या सणाचा आकर्षक हा केक असतो. कारण घरातील सर्वजण केक कटिंग करून आणि मिठाई वाटून हा आनंद साजरा करतात.

चर्चमधील विशेष कार्यक्रम

नाताळ सणाच्या दिवशी चर्च मध्ये खूप कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या दिवशी चर्च मध्ये प्रार्थना, भजन-किर्तन आणि नाट्यप्रयोग असे कार्यक्रम केले जातात. हे जे काही कार्यक्रम होतात यातून लोकांना नाताळचा खरा अर्थ कळतो. चर्च मध्ये सर्व जातीचे लोक एकत्र येऊन शांती, प्रेम आणि सौहार्दाचा अनुभव घेतात.

नाताळचा सामाजिक संदेश

Natal Nibandh in Marathi – हा नाताळ सण फक्त आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नसून तो आपल्या भारत देश्याच्या समाजाला एक चांगला व महत्वाचा संदेश देतो. आणि तो म्हणजे आपल्या भारतातील गरीब, गरजू , अनाथ, किंवा, आजारी अश्या लोकांना मदत करणे. रोडला राहणार एखादा व्यक्ती असेल तर त्याला सेवाभावे काहीतरी मदत करणे. व त्यांना प्रेमाने बोलणे आणि त्यांना जे काही दुःख आहे. ते कमी करणे. नाताळ सणाचे हेच खरे स्वरूप आहे. भारत देशातील अनेक लोक या दिवशी काही ठिकाणी अन्नवाटप व दानधर्म करतात.हा सण आपल्याला एक मानवतेचा संदेश देतो व आपल्या समाजात एकता आणि बंधुता निर्माण करतो.

भारतातील नाताळ साजरा करण्याची पद्धत

भारत देश्या सारख्या विविधतेने नटलेल्या देश्यामध्ये सर्व समाज अतिशय आनंदाने व उत्सहाने नाताळ हा सण साजरा करतात. आपल्या भारतातील गोवा, केरळ, मुंबई, कोलकाता अश्या अनेक देशात नाताळचा जल्लोष मोठ्या उत्सहाने व विशेष दिसून येतो. पण मात्र इतरही देशात व राज्यात नाताळ हा सण लोक आपापल्या पद्धतीने साजरा करतात. आपल्या भारताची एकच खरी ओळख आहे ती म्हणजे कि विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात.

निष्कर्ष

नाताळ सण हा आनंद, प्रेम, शांती व मानवतेचा सण आहे. हा सण आपल्याला समजावर किंवा एकमेकांवर प्रेम करायला व समाजासाठी काहीतरी चांगली गोष्ट करावी हे करायला देखील शिकवतो. नाताळ सण आपल्याला चांगले विचार करण्याची आणि माणुसकीला जपण्याची प्रेरणा देतो.

–समाप्त–

नमस्कार माझ्या वाचक मित्रांनो ( Natal Nibandh in Marathi – नाताळ मराठी निबंध ) आपणांस माझा निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व अजून कोण कोणते निबंध, भाषण, जीवनचरित्र पाहिजे असेल तर कंमेंट मध्ये नक्की सांगा. व कोणतेही निबंध पाहिजे असेल तर माझी वेबसाइट गूगल वर सर्च करा.

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.