प्रस्तावना
Veleche Mahatva Marathi Essay – मानवाच्या जिवनातील अत्यंत मौल्यवान गोष्ट हि वेळ आहे. कारण धन, संपत्ती, ह्या गोष्टी आपण पुन्हा मिळवू शकतो पण गेलेली वेळ पुन्हा येत नाही. त्यामुळे वेळेची कदर करायला शिका आपला मौल्यवान वेळ कुठेही फालतू वाया घालवू नका. आणि वेळ हा प्रत्येकासाठी समान असतो परंतु योग्य वापर करणाराच जीवनात यशस्वी होतो. याच बरोबर तुम्ही जेव्हा तुमच्या जीवनात वेळेचा सदुपयोग कराल तेव्हा तुम्हाला शिस्त, प्रगती आणि समाधान प्राप्त होईल.
वेळ म्हणजे काय
वेळ हि न थांबणारी नैसर्गिक शक्ती आहे. जो माणूस वेळेचा उपयोग चांगल्या प्रकारे करतो त्याचे भविष्य चांगले घडते. वर्षे, रात्र, दिवस, वेळेवरच अवलंबून आहे. आणि वेळ हि सर्वांसाठी सामान आहे. श्रीमंत, गरीब, लहान, मोठे या सर्व माणसांचे चोवीस तास सारखेच असतात.
जीवनातील वेळेचे स्थान
Veleche Mahatva Marathi Essay – मानवाचे कार्य व जीवन हे अतूटपणे वेळेशी जोडले गेले आहे. माणसाचा जन्म ते मृत्यू पर्यंत एक एक क्षण हा वेळेच्या दारातच घडतो. माणसाच्या जीवनाचे तीन, चार टप्पे असतात तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व आणि हे पण वेळ आल्यावरच अनुभवायला मिळतात. आपण योग्य वेळेवर योग्य तो निर्णय नाही घेतला तर शेवटी आपल्याला पश्चात्ताप करत बसावा लागतो. आणि यामुळेच वेळेचा सदुपयोग करा दुरुपयोग करणे थोडं टाळा.
विद्यार्थी जीवनात वेळेचे महत्त्व
विद्यार्थी जीवन हे आयुष्यातील अतिशय महत्वाचा टप्पा आहे. कारण या काळात तुम्ही जेवढं वेळेचं नियोजन कराल आणि याच बरोबर शिस्त, मेहनत हे सर्व तुमच्या आयुष्यभरासाठी उपयोगी पडते. आणि आपण वेळेचं नियोजन का करतो खेळ, छंद, अभ्यास आणि आपलं दैनंदिन जीवन याचा समतोल राखण्यासाठी आपण वेळेचं नियोजन करतो. आज जे काम आहे ते आजच पूर्ण झाले पाहिजे आणि हि सवय आपल्याला विध्यार्थी असतानाच लागली पाहिजे.
वेळेचा अपव्यय आणि दुष्परिणाम
तुम्ही जर तुमच्या हाताने वेळेचं अपव्यय केला तर तुमच्या स्वतः च्या आयुष्याचा अपमान झाला समजा मग. तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा पण तो कामापुरताच झाला पाहिजे आणि याच बरोबर आळस गप्पा या मुळेही वेळ वाया जातो. वेळ हि एक अशी गोष्ट आहे कि एकदा निघून गेली कि ती परत आणता येत नाही. जो व्यक्ती वेळ वाया घालवतो त्याच्या हातात फक्त अपयश, निराशा व पश्चात्ताप या शिवाय काही उरत नाही.
यश आणि वेळेचा संबंध
Veleche Mahatva Marathi Essay – मी मागच्या पंधरवाड्यात यशस्वी व्यक्तींचा अभ्यास केला तर मला असा अनुभव आला कि त्यांनी त्यांच्या जिवनात वेळेचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींनी त्यांच्या जीवनातील सर्व वेळ राष्ट्रहितासाठी दिला.
त्यांनी त्यांच्या वेळेत खूप महान कार्ये केली शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई यांना सोबत घेऊन मुलींसाठी पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे सुरु केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत संविधान लिहिले चवदार तळ्याचे पाणी समाजासाठी मिळून दिले. आणि याच बरोबर दलित महिलांचे जे काही हक्क आहे त्यासाठी कार्य केले.
वेळेचे नियोजन कसे करावे
आपण वेळेचे योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी पाळणे आवश्यक आहे. आणि आपल्याला आजच्या दिवशी काय काम आहे हे देखील ठरवणे महत्वाचे आहे. आणि आपले जे महत्वाचे कामे आहेत त्यांना जास्तीत जास्त प्राधांन्य देणे. आणि ज्या दैनंदिन सवयी आहे त्या वेळेवर पाळणे.
वेळेचे मोल ओळखणे
Veleche Mahatva Marathi Essay – प्रत्येक व्यक्तीची वेळ हि सोन्यापेक्षाही महाग आहे असे म्हटले जाते. तुमच्या हातून सोन गमावलं तर तुम्ही पुन्हा मिळवू शकता पण गेलेली वेळ हि परत येणार नाही. आणि ती तुमच्या आयुष्यात मिळू शकत नाही. आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आपल्या उपयुक्त कामासाठी वापरला पाहिजे. वेळेची किंमत जो माणूस ओळखतो तोच माणूस आयुष्यात यशस्वी होतो.
उपसंहार
शेवटी आपण आस हि म्हणू शकतो कि वेळ हि आपल्या जीवनाचा खूप मोठा आधारस्तंभ आहे. वेळेचा योग्य कामात आणि चांगल्या प्रकारे वापर केला तर त्या व्यक्तीचे भविष्य उज्वल होते. म्हणूनच प्रत्येकाने वेळेची पण किंमत करायला पाहिजे. व वेळ आणि संधी कोणासाठीही थांबत नाही. मग आपण हेच लक्षात ठेऊन वेळेचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. तुम्ही वेळेचा सदुपयोग केला तर तुम्ही जे स्वप्न पहिले आहे. ते आपो आप आपल्या पायाशी येईल हे तर मात्र खरं आहे.





