My Favorite Festival Diwali Essay Marathi 2025 – माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध

प्रस्तावना

दिवाळी आली फक्त एवढेच दोन शब्द ऐकले का आपल्याला किती आनंद होतो याविषयी वेगवेगळे विचार येत मन अगदी उत्साही होऊन जाते. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण व सणांचा मेळावा यामध्ये वसुबारस,धनत्रयोदशी,बालप्रतिपदा,दीपावली पाडवा भाऊबीज असे अनेक सण एकत्र येऊन हे दीपावलीचे पर्व बनते.दिवाळी किंवा दीपावली या नावाने आपण या सणाला संबोधतो. असा वर्षातून एकदाच येणारा सर्वांच्या आवडीचा व अगदी सर्वच जण ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात असा हा सण म्हणजे दीपावली.

अनेक दिवसापासूनच या सणाचे आपल्या सर्वांना वेध लागलेले असतात. लहान थोर अगदी सर्वांसाठीचे हे पर्व चैतन्यमय व आनंदाचे असते. यामध्ये प्रत्येकाची आनंद लुटण्याची परिभाषा वेगळी असते कोणी नवीन कपडे खरेदी करून आनंदी होतं, तर कोणी फटाके वाजवून तर कोणी गोड व तिखट फराळाचा आस्वाद घेऊन आणि कोणी इतरांना मदत करत त्यांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवत आनंद लुटत असतं. प्रत्येकाची आनंद लुटण्याची परिभाषा वेगवेगळी असते.

दिवाळी : आनंदाचा सण व पारंपरिक भावना


शुद्ध व पवित्र विचाराच्या दिव्याच्या प्रकाशाने अविचारी व दृष्ट प्रवृत्तीच्या काळोख दूर सारणारे हे दीपावलीचे तेजस्वी पर्व असते.नवीन कपडे त्या बरोबरच इतर काही अनेक गोष्टींची खरेदी या दीपावली सणांमध्ये केली जात असे. मला असे वाटते की पूर्वी दीपावली हा सण खूप आनंदाचा असायचा. त्यावेळी फक्त दिवाळी या सणाला नवीन कपड्यांची व इतर काही आवश्यक गोष्टींची खरेदी केली जात असे आज काय रोजच दिवाळी असते. तेव्हा अपेक्षाही माफक असायच्या व आनंद अमर्यादित.आज बघायला गेले तर परिस्थिती अगदी या उलट झाली आहे अपेक्षा मात्र खूप सार्‍या आणि त्या पूर्ण होऊनही आनंद मात्र थोडा किंवा काहीच नाही व कधीकधी त्यातून मिळणारा आनंदही आजच्या पिढीला उपभोगता येत नाही. काही गोष्टी स्वतः करण्याचा आनंद आहे तो आजच्या पिढीला समजणार नाही कारण की आजकाल सारे रेडीमेड व कॉन्ट्रॅक्ट बेस वर आहे यामध्ये तुमचे घर सजवायचे असो की आचाऱ्याकडून फराळ बनवून घ्यायचा असो अगदी सगळंच काही…!

my favorite festival diwali essay marathi
my favorite festival diwali essay marathi

तेव्हाची दिवाळी, आताची दिवाळी उत्सवातील बदल

बऱ्याच गोष्टी स्वतः करून आनंद मिळतो. वेळेअभावी किंवा कदाचित जास्त कामाचा ताण त्यामुळे तो आनंद अनुभवणे आजच्या पिढीला शक्य नाही. आजकाल कृत्रिम गोष्टींचा खूपच भडीमार झाला आहे ते मग प्लास्टिकचे फुले किंवा त्याची तोरणे असोत किंवा पाण्यावर लागणारा दिवा असो. वैज्ञानिक प्रगती खूप झाले पण चांगल्या विचारांची अधोगती होत चालली आहे.आज आपण आकाश कंदील सोबत विजेच्या (लाईटच्या) माळा विद्युत रोषणाईने आपल्या घर अगदी झगमगाट करतो व गोड धोड पदार्थ करतो.


परंतु खरंच कधी विचार केला आहे का तेवढीच चकाकी व गोडवा आपल्या कुटुंबात व असणाऱ्या नात्यात राहिला आहे का…? याचे उत्तर जर लाईटच्या भाषेत द्यायचे ठरले तर मी म्हणेल तो डीम (कमी) झाला आहे.आजकाल तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी केली तर ती वस्तू कशी आहे यापेक्षा कुठून खरेदी केली मोठ्या दुकानातून किंवा मॉल मधून खरेदी केली आहे ? का व त्याच्या किमतीवरून किंवा ब्रँड वरून ती चांगली आहे की नाही हे ठरवले जाते…


my favorite festival diwali essay marathi – आजकालच्या मुलांना जर आई-वडिलांनी आपली परिस्थिती नसतानाही त्यांची हौस पूर्ण करत एखादी वस्तू घेऊन दिली तर त्यातील बऱ्याच मुलांना किंवा त्यांच्या मित्रांना असे वाटते की आणखी थोडे पैसे घातले असते तर हे पेक्षा भारी मॉडेल मिळाले असते किंवा अमुक तमुक ब्रँडचा घ्यायला हवे होते अशी त्यांची विचारसरणी झाली आहे बऱ्याचदा नवीन वस्तू खरेदी करूनही ते आनंदी नसतात किंवा त्यातला आनंद त्यांना उपभोगता येत नाही. त्यांच्या या हट्टापायी आई-वडिलांनी केलेले कष्ट व त्यांनी स्वतःच्या असणाऱ्या इच्छावर घातलेले पांघरून त्यांना दिसत नसत व काहींना आपल्या परिस्थितीची जाणीव असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करतात हि फार दुर्दैवाची बाब आहे.

आपल्यासाठी दीपावलीची मूलभूत व्याख्या म्हणजे नवीन कपडे खरेदी करणे सोने, नानी, गाडी ,मोबाईल सारख्या इ.गोष्टी खरेदी करणे व गोडधोड पदार्थ बनवणे,फटाके वाजवणे,घर सजवणे ही अशी आपली परिभाषा होय. ह्या गोष्टी दरवर्षी आपण करतच असतो यावेळेस आपण थोड्या वेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी करू शकतो.आपण काय जवळच्या किंवा नात्यातल्या व्यक्तींना भेटवस्तू देतो, शगुन देतो किंवा त्यांना घरी फराळाला बोलवतो. आजकाल कॅडबरीचा मोठा बॉक्स किंवा इतर काही देणे म्हणजे दिवाळी साजरी करणे होय, किंवा तो दिला तरच तुमच्या नात्यात गोडवा आहे, व त्याने स्टॅंडर्ड मेंटेन होतं अशी विचारसरणी झाली आहे.


ह्या अशा अनेक गोष्टी आपल्यावर थोपवल्या जात आहेत ते आपल्याविषयी काय विचार करतील या कॅटेगिरीतले बरेच लोक याचा स्वीकार करतात.यामुळे खरंच तुमचं प्रेम,सद्भावना समोरच्याला जाणवते अशातला काही भाग नाही,यासाठी अनेक वेगळे पर्याय आहेत परंतु आजच्या पिढीला अशा प्रकारच्या गोष्टी खूप आवडतात.


सध्या दीपावली पर्व सुरू असूनही कित्येकांच्या घरात अजूनही अंधार आहे तो म्हणजे गरिबीचा,अतीवृष्टीच्या संकटामुळे बळीराजाही या अंधारात ओढवला गेला आहे. त्या सोबतच अनेक जणांची आर्थिक परिस्थिती डगमगली त्यामुळे त्यांना दिवाळी साजरी करण म्हणजे त्यांच दिवाळ निघणं असंच झालं आहे. अनेक जणांची परिस्थिती ही हलाकीची असल्यामुळे त्यांना दिवाळी म्हणजे काय हे सुद्धा माहित नसतं.

my favorite festival diwali essay marathi – आर्थिक परिस्थितीमुळे ते दिवाळी साजरी करू शकत नाही. आपली दीपावलीची परिभाषा त्यांच्यासाठी लागू होत नाही.म्हणून अशा व्यक्तींना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.अशा व्यक्ती शोधण्यासाठी आपल्याला कुठे लांब जाण्याची गरज नसते त्या आपल्या सभोवताली असतात.आपल्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला त्या दिसूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो बऱ्याचदा कधी कधी आपण त्यांना काहीतरी मदत करावी असा फक्त विचार आपल्या मनात येतो व कृती करायची आपल्याकडून राहून जाते.

परंतु या दीपावलीच्या सुट्टीत आपल्याला मिळालेल्या वेळातून थोडासा वेळ आपण त्यांना देत जर त्यांना मदत केली तर खूप बरे होईल. आपल्यापेक्षा आर्थिक परिस्थितीने सधन असणाऱ्यांना भेटवस्तू देण्यापेक्षा किंवा घरी फराळाला बोलवण्यापेक्षा ज्यांना खरोखर त्याची गरज आहे असे व्यक्तींना मदत केलेली कधीही चांगली,मदत करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्याची मनातुन इच्छा असते त्याला ते सापडतात.

आपण म्हणतो दिवाळी प्रकाशाचा सण आहे तर मग या दिवाळीला फक्त प्रयत्न एवढा करा की तो आनंदाचा दिवा गरजवंतांच्या घरात लावा जेणेकरून त्यांच्या घरी आनंदाचा प्रकाश पसरेल व त्यांच्यासाठी हे दीपावलीचे पर्व तेजोमय ठरेल. बऱ्याच जणांना ही मदत केल्यावर सुख किंवा आत्मिक समाधान लाभेल. तुम्ही त्यांना केलेल्या मदतीची परतफेड (रिटर्न गिफ्ट) त्यांच्या परिस्थितीमुळे कदाचित ते तुम्हाला देऊ शकत नाही, परंतु त्यांनी दिलेले अमुल्य आशीर्वाद हेच तुमच्यासाठी भेटवस्तू असतील हे मात्र निश्चित….! चला तर मग संकल्प करूया आपल्या प्रमाणेच हे दीपावली पर्व इतरांसाठी तेजोमय ठरेल. एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न इतरांना आनंदाचा प्रकाश देण्याचा…!

आपणा सर्वांना व आपल्या कुटुंबीयांना या सुंदर व सोनेरी अशा दीपावली पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आपणांस व आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो व सर्वांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना….!

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.