प्रस्तावना
Pani adva pani jirva essay in marathi हवा पाणी हि निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी जीवनावश्यक असल्यामुळे पाण्याच्या टांचाईची समस्या सोडवण्याला अग्रक्रम द्यावा लागतो. खेड्यापाड्यांतून हि समस्या फारच बिकट आहे.
शहरात ठराविक वेळी पाणी येत असेल,तर सर्व व्यवहार झटपट उरकून पाणी भरून ठेवता येते.
पण खेड्यापाड्यातील लोकांना घडाभर पाण्यासाठी मौलोंमैल चालत जावे लागते. किंवा गावात येण्याऱ्या कष्टपूर्वक पाणी मिळवावे लागते. अर्थातच मिळालेल्या पाण्याचा उपयोग प्रथम पिण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी भाग पडते. स्वछतेसाठी पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे अस्वच्छतेतून रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास नवल काय ? माणसाच्या दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याची एवढी चण चण भासते, तर शेतीला आणि वनस्पतींच्या वाढीला पाण्याची गरज किती पराकोटीची असेल, याची कल्पना न केलेलीच बरी !
महाराष्ट्रातील नद्या आणि धरणे
वास्तविक भारतात हा नद्यांचा देश आहे. भारताच्या काही भागात पावसाचे पाणीही भरपूर मिळते. कोकणात व इतर अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो. पावसाळ्यात भारतातील काही नद्यांना पूर येतात. ब्रम्हपुत्रा , गंगा , यमुना, गोदावरी इत्यादी नद्यांना येणाऱ्या पुरांमुळे आजूबाजूच्या प्रदेशाची वाताहत झाल्याचा बातम्या वर्तमान पात्रांत दरवर्षी येतात. याचा अर्थ: असा कि उपलब्ध होण्याऱ्या पाण्यापैकी ८०% पाणी समुद्रात वाहून जाते, हे भारताचे दुर्दैव आहे.
धरण बांधून पाणी अडवणे हा त्यावरचा एक उपाय आहे. तसेच, देशातील सर्व नद्या एकमेकांना जोडून नद्यांचे जाळेच निर्माण करण्याची एक कल्पना सध्या चर्चेत आहे. हा फारच मोठा फायदा देणारा उपाय आहे. काही धरणामुळे काही लोकांची सोय झाली असली तरी अजून असे काहीतरी जिल्ल्हे आहेत कि, जिथे उन्हाळ्यात लोकांना थेंबभर पाणी मिळणेही मुश्किल होते.
Pani jirva in marathi nibandh – धरणामुळे खेड्यापाड्यात वीज पसरली
pani adva pani jirva essay in marathi भाक्रा-नांगल, दामोदर व्हॅली, कोयना, नाथसागर, नागार्जुनसारखा अशी धरणे भारतात ठिकठिकाणी बांधली गेली. हि गोष्ट चांगली आहे. पण या धरणामुळे इतरही काही समस्या निर्माण झाल्या. धरणांमुळे खेड्यापाड्यात वीज पोहोचली हे चांगले झाले; पण त्यामुळे विजेवर चालणारे पाण्याचे पंप वापरले जाऊन पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होऊ लागल्यामुळे विहिरी, नद्या कोरड्या पडल्या. विजेमुळे कारखाने सुरु झाले. हि गोष्ट चांगली घडली; पण कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडले गेल्यामुळे जलप्रदूषण होऊ लागले. गंगायमुनेसारख्या मोठ्या नद्यांच्या बाबतीतही हा प्रदूषणाचा प्रश्न प्रचंड प्रमाणात भोडसावत आहे.
pani adva pani jirva essay in marathi पिण्याच्या पाण्याप्रमाणेच शेतीसाठीही आपल्याला पाण्याची गरज आहे. पाण्यासाठी आपण कितीही विहिरी खोदल्या व कितीही पाण्याचे पंप बसवले, तरी ते सर्व निरुपयोगी ठरणार आहे. कारण जमिनीखालील पाण्याची पातळीचं खाली खाली जात आहे. हि पातळी कशी वाढेल, हे प्रथम पहिले पाहिजे. यासाठी दोन योजना तातडीने हाती घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करणे. कारण झाडे आपल्या मुळांद्वारे जमिनीखालील पाण्याचे झरे धरून ठेवतात. झाडांची संख्या वाढली तर जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. सध्या बेसुमार वृक्ष तोडीमुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडे लावली पाहिजेत. तसेच पाणी आडवा , पाणी जिरवा हि दुसरीही योजना युद्धपातळीवर राबवायला हवी. सर्वत्र मोठ्या प्रमाणात सिमेंटचे बांधकाम झाल्यामुळे पाणी जिरायला जमिनीचं राहिली नाही. आभाळायून पडलेले पाणी प्रयत्न पूर्वक जमिनीत जिरवले पाहिजे. जलसंधारण वाढवले पाहिजे यामुळे जमिनीखाली पाण्याची पातळी वाढेल मग झरे , विहिरी , नद्या यांचे पाणी आटणार नाही.अश्या प्रकारे पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने बहरू लागेल.





