प्रस्तावना
My Mother Essay In Marathi – या जगात प्रत्येक अशे नाते असतात कि ज्याला वेगळी उब आणि गोडी असते. पण ‘आई’ ची तुलना कोणत्याही नात्याशी किंवा कोणत्याच गोष्टीशी करता येत नाही. आपली आई म्हणजे त्याग, सेवा, प्रेम, व निःस्वार्थ भावना याचे मूर्त स्वरूप आहे. मी आईला प्रेमाने “देवाघरची आंबी” असे म्हणतो. कारण माझ्या आईचे अस्तित्व म्हणजे आमच्या घरातील सुख-शांती आणि समाधानाचे मूळ स्रोत आहे. माझी आई हि आमच्या कुटुंबासाठी अहोरात्र झटणारी शांत व प्रेमळ आहे.
माझ्या आईचे व्यक्तिमत्त्व
माझ्या आईचा स्वभाव हा अतिशय संयमी,कष्टाळू आसा आहे. माझ्या आईचे शब्दच अशे आहेत कि मला त्यात आग्रहापेक्षा प्रेमाचं जास्त दिसत. आमच्या घरातील प्रत्येक सदस्याला ती अतिशय प्रेमाने व आदराने बोलते. माझ्या आईला आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काय काय आवडत प्रत्येकाच्या आवडी निवडी माहिती आहेत. कोणाला कोणते पदार्थ व माझे शाळेचे पेपर कधी असतात हे सर्व माझ्या आईला माहीत असत. व त्याच बरोबर माझ्या वडिलांचे कामाचे कागदपत्रे कधी पाहिजे त्यांना ह्या सर्व बारीक गोष्टी माझी आई लाक्षात ठेवते.
मला माझ्या आईची एकच गोष्ट आवडते आणि ती म्हणजे कि तिचा हसरा चेहरा. माझ्या आईला कितीही कामाचा ताण असला तरीही ती नेहमी तिचा चेहरा हसराच ठेवते. तिच्या चेहऱ्यावरील हे हास्य पाहून माझा दिवस हि प्रकाशमान होऊन जातो.
आईची दिनचर्या
My Mother Essay In Marathi – माझ्या आईची रोजची दिनचर्या हि पहाटेच सुरु होते. आणि आम्ही मात्र त्या वेळेत गाढ झोपेत असतो. आणि तेव्हा उठून आईने देवाची पूजा आणि आमच्या घरातील स्वछता आणि नाश्त्याची तयारी देखील केलेली असते. आणि हे सगळं करून आम्हाला उठवते आणि आम्हाला शाळेसाठी गरबडीने तयार करते. आम्हाला दोघांना आमच्या आवडतीचे पदार्थ डब्याला बनवलेले असतात. वडिलांना देखील कामावरती लागणाऱ्या गोष्टी ती अतिशय सांभाळून व प्रेमाने देते.
दुपार झाली कि माझी आई घरातील सर्व काम आवरून आई थोडावेळ विश्रांती घेते. पण कधीही तिच्या मानावर सुस्ती येत नाही. आई आम्हाला अभ्यासात देखील खूप मदत करते. आवश्यक त्या गोष्टी समजावून सांगते व आमच्याशी बोलते. माझ्या आईला संपूर्ण दिवसाचा थकवा जरी असला तरी पण रात्री कुटुंबाला जेवण वाढताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळच समाधान पाहायला भेटत.
आईचा त्याग आणि प्रेम
माझी आई तिच्या सर्व इच्छांना बाजूला ठेऊन ती आमच्या कुटुंबाच्या स्वप्नांना प्राधांन्य देते. माझी आई अनेकवेळा तिच्या ज्या स्वतःच्या इच्छा, छंद,आराम यांना दुरावते. कारण कि तिला आस वाटत कि आपल्या मुल्लांना सगळं मिळावं कधी कधी सर्वांनाच नवीन कपडे घ्यावे लागते. तेव्हाहि ती म्हणते कि माझे कपडे राहूद्या आणि यांचं बघा.
आईचा संस्कार आणि शिकवण
माझी आई घरातील सर्वांची काळजी घेणारी एक व्यक्ती आहे. पण त्याच बरोबर ती आमच्या घरातील पहिली गुरु आहे. माझी आई आम्हाला चांगल्या सवयी शिकवते प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, व सर्वांशी प्रामाणिक पणे वागणे वडीलधाऱ्या व्याक्तींचा आदर ठेवणे.
माझ्या आईने हि जी काही शिकवण दिली आहे. ती मी कायम माझ्या मनात कोरली आहे. आम्ही अभ्यास जरी पण मन लावून नाही केला तरीही ती रागवत नाही पण समजावून सांगते. माझ्या आईची प्रत्येक शिकवण माझ्या आयुष्याला दिशा आणि शिकवण देते.
आईचा कुटुंबावर परिणाम
My Mother Essay In Marathi – माझ्या आईकडे आमच्या घरातील प्रत्येक वातावरणाला एक अनोखी जादू आहे. आईच्या उपस्थिती मध्ये घरात शांती, समंजस पणा व प्रेमाची हवा पसरते. माझ्या आईच्या शब्दामुळे घरातील प्रत्येक वाद शांत होतात. माझ्या आईच्या स्पर्श्याने माझं प्रत्येक दुखं बरं होत. मी कितीही थकलेलो असलो तरीही तिचं बोलणं ऐकून माझा सर्व थकवा निघून जातो. व मला कोणत्याही कामामध्ये साथ आणि प्रोत्साहनामुळे एक नवउर्जा मिळते.
माझी आई घरातील एक केंद्रस्थान आहे. आई शिवाय माझं घर फक्त चार भिंती असं ठरत. व त्याच बरोबर माझ्या आईचे अस्तित्व म्हणजे आमच्या घराला मिळालेली जीवनशक्ती आहे.
आई आणि माझं नातं
माझ्या आईला माझ्या मनातील भावना शब्दात न सांगता देखील कळतात. माझी आई माझी पहिली मैत्रीण, पहिली शिक्षिका, व पहिली गुरु आहे. माझ्या आयुष्यातील एक छोटासा यशस्वी क्षण तिला खूप आनंद देतो. आणि माझ्या आयुष्यामध्ये अपयश जरी आलं तरीही ती मला धीर देते. माझ्या आईच आणि माझं नातं फक्त रक्ताचं नाही तर आत्म्याचं अतूट बंधन आहे.
आईचे महत्त्व
आपल्या जगातील प्रत्येक व्यक्ती मग तो गरीब असो किव्वा श्रीमंत त्याच्या जीवनामध्ये त्याच्या आईची भूमिका खूप भक्कम असते. आई तिच्या मुल्लांच पालन पोषण करतेच पण त्याच बरोबर त्यांच्यातील चांगले गुण, नेतृत्व, क्षमता वाढवते. आणि तिच्या पाल्यांना योग्य मार्गावर नेते. आपल्या आईची किंमत आपुन पैशात किंवा वस्तूंमध्ये अजिबात मोजता येत नाही. आपली आई आपल्याला देवाने दिलेली एक अनमोल देणगी आहे.
समारोप
माझी आई माझ्या जीवनातील खूप मोठी प्रेरणा आहे. व त्याच बरोबर प्रेमाचा अथांग मोठा सागर देखील आहे. तिच्या मायेच्या आलिंगनाला, शिकवणीला व सेवेला काही पर्यायच नाही. माझे आई वडील माझ्यासाठी देवाप्रमाणेच पूजनीय आहे. आणि त्यांच्या मुळेच माझं जीवन सुंदर व अर्थपूर्ण आहे.
–समाप्त–
नमस्कार माझ्या वाचक मित्रांनो ( My Mother Essay In Marathi – माझी आई मराठी निबंध ) आपणांस माझा निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व अजून कोण कोणते निबंध, भाषण, जीवनचरित्र पाहिजे असेल तर कंमेंट मध्ये नक्की सांगा. व कोणतेही निबंध पाहिजे असेल तर माझी वेबसाइट गूगल वर सर्च करा.





