Makar Sankrant Marathi Nibandh

Makar Sankrant Marathi Nibandh – मकर संक्रांत मराठी निबंध

प्रस्तावना

Makar Sankrant Marathi Nibandh – आपल्या भारतीय सण उत्सवांची परंपरा हि अतिशय विविधतेने व समृद्धतेने नटलेली आहे. व आपल्या भारतीय संस्कृतीशी घट्टपणे जोडलेली आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीतील सणांपैकी मकर संक्रांत हाच सण महत्वाचा व वैशिष्ट्यपूर्ण सण मानला जातो. मकर संक्रांत हा सण केवळ धार्मिक नसून तो सण निसर्गाशी, शेतीशी, व इतर सामाजिक व वैज्ञानिक गोष्टीशी निगडित आहे. भारत देशात हा सण खूप वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. आणि भारतात हा सण साजरा करण्याचा एकच भावार्थ आहे तो म्हणजे काहीतरी नवीन सुरुवात आणि सकारात्मकता.

मकर संक्रांतीचा अर्थ व महत्त्व

Makar Sankrant Marathi Nibandh – मकर हा शब्द तर सर्वांनाच माहिती आहे. तर मग मकर म्हणजे कि मकर राशी आणि संक्रांत म्हणजे संक्रमण होणे. आता मी तुम्हाला सांगणार आहे कि आपण मकर संक्रांति केव्हा साजरी करतो. सूर्य हा जेव्हा जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी मकर संक्रांति साजरी केली जाते. आणि हा सण साधारणपणे दरवर्षी जानेवारी महिन्यात १४ किंवा १५ तारखेलाच येतो. आणि या दिवशीच सूर्याचा उत्तरायणाचा प्रवास देखील सुरु होतो.

व या दिवशी सूर्याच्या उत्तरायणाला देखील शुभ मानले जाते. व याच कारणामुळे मकर संक्रांत या सणाला विशेष आणि खूप महत्व आहे. तुम्हाला माहितीये का कि हिंदू धर्मानुसार या दिवशी गंगा, गोदावरी, कृष्णा अश्या नद्यांमध्ये स्नान करून दान देण्याची परंपरा आहे. आणि उत्तरायणाच्या काळात दानधर्माची कार्ये, पूजा आणि पुण्यकर्मे हे म्हणजे कि अत्यंत फलदायी असे मानले जातात.

मकर संक्रांत आणि निसर्ग

Makar Sankrant Marathi Nibandh – भारत देशातील बदलांचे प्रतीक घडून आणतो तो म्हणजे मकर संक्रांति हा सण. सूर्यप्रकाश वाढतो हा सण झाल्यावर हिवाळा ह्या ऋतूतील थंडी कमी होऊन दिवस हे मोठे होऊ लागतात. ज्यामुळे वातावरणात उष्णता वाढू लागते. व शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा असतो. या काळात शेतीमध्ये चांगली पिके होण्याच्या मार्गावर असतात. त्यामुळे शेतकरी या काळात अतिशय आनंदी असतात.

आणि आपल्याला आपल्या संस्कृतीने एक निसर्गाबद्दल व संपत्तीबद्दल आभार मानण्याचा संदेश दिला आहे. आणि तो संदेश मकर संक्रांति या सणामध्ये दडलेला आहे. आणि तो म्हणजे तीळ, ऊस, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांचा वापर करणे.

तिळगुळाची परंपरा

तिळगुळ म्हणलं कि आपल्याला लगेच मकर संक्रांति हा सण आठवतो. आणि या सणाची ओळख एका वाक्याने देखील आहे. आणि ते वाक्य म्हणजे “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” हे आहे. व तिळगुळ हे पदार्थ थंडीच्या दिवसांत आपल्या शरीरासाठी देखील खूप उपयुक्त असतात. तिळगुळ खाल्ला कि आपल्या शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते.

पतंग उडवण्याची परंपरा

Makar Sankrant Marathi Nibandh – मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा भारतात खूप काही काळापासून आहे. व ती फक्त भारतात मर्यादित नसून ती इतर भागात व देश्यात दिसून येते. जसे कि गुजरात, राजस्थान, अश्या आणखी राज्यामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी आकाश रंगीबेरंगी पतंगाने भरलेले असते. पतंग उडवणे हा एक त्या दिवशी आनंद लुटण्याचा खेळ आहे.

पतंग उडवण्याचा हा खेळ आपल्या शरीराशी व आरोग्याशी निगडित आहे. आपण जेव्हा पतंग उडवतो तेव्हा जो सूर्यप्रकाश आपल्या शरीरावर पडतो तेव्हा आपल्याला ‘व्हिटॅमिन डी’ मिळते आणि हे आपल्या शरीराला व आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे.

भारतातील विविध भागांतील मकर संक्रांत

मकर संक्रांत हा सण भारतातील प्रत्येक भागात वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो हा सण इतर राज्यांत वेगळ्या नावाने ओळखला जातो. पंजाबमध्ये ‘लोहडी’, आसाममध्ये ‘भोगाली बिहू’, तामिळनाडूमध्ये ‘पोंगल’, आंध्र प्रदेश व कर्नाटकात ‘संक्रांती’. भारत देशात आस आहे कि समाज प्रत्येक सण साजरे करतो पण प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतो. आणि मकर संक्रांत हा सण जरीही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करत असेल तरीही त्यातील आनंद, कृतज्ञता आणि एकतेचा भाव सर्वत्र दिसतो.

मकर संक्रांत आणि सामाजिक संदेश

मकर संक्रांत हा सण आपल्याला एक लय चांगला संदेश आणि मूल्य शिकवतो बर का आणि तो म्हणजे कि सूर्य जसा दक्षिणायनातून उत्तरायणाकडे वळतो, तसच माणसानेही अंधाराकडून प्रकाशाकडे, वाईट प्रवृत्तींपासून चांगुलपणाकडे वळावे.

निष्कर्ष

मकर संक्रांत हा केवळ हा एक सण नाही तर हे आपल्या भारतीय संस्कृतीचे सामाजिकतेचे व एकता याचे प्रतिक आहे. आपल्या भारत देशात जेवढे हि सण साजरे होतात तेवढे कोणत्याही देशात होत नाही. हा सण आपल्याला नाते संबंध जपायला शिकवतो हा सण आपल्याला सकारात्मक विचारांनी पुढे जाण्याची प्रेरणा देतो

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.