Gudi padwa essay in marathi

Gudi Padwa Essay In Marathi – गुढीपाडवा मराठी निबंध

प्रस्तावना

Gudi padwa essay in marathi – आपला भारत देश अनेक व विविध सण-उत्सवांनी आणि संस्कृतीने नटलेला आहे . प्रत्येक सण उत्सव या मागे काहीतरी महत्व दडलेले आहे. आणि आपल्या भारत देशातील एक आनंद आणि मराठी व हिंदू समाजातील लोकांच्या नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा सण आपण गुढी पाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा करतो. गुढी पाडवा हा सण आपल्या मराठी संस्कृतीचा व परंपरेचा अभिमान आहे. आणि या दिवसापासून काहीलोक नवीन संकल्प करतात.

गुढीपाडव्याचा इतिहास

गुढी पाडवा या सणाला देखील काही ऐतिहासिक संदर्भ आहे. आणि या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला आणि अयोध्येत विजयप्राप्ती केली. आणि मग त्या आनंदात गुढी उभारली गेली असे मानले जाते. तस आपण जर इतिहासात पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक विजयानंतर गुढी उभारून आनंद साजरा केला. आणि तेव्हापासूनच अख्या महाराष्ट्रातील समाज गुढीपाडव्याचा सण साजरा करतोय. तेव्हापासून गुढी पाडवा हा सण फक्त परंपरा नसून तो सण विजयाचे,समृद्धीचे,शौर्याचे प्रतीक मानले जाते.

गुढीचे स्वरूप आणि महत्त्व

Gudi Padwa Essay In Marathi – आता मी तुम्हाला सरळ गुढीचे स्वरूप सांगणार आहे गुढी म्हणजे एक उंच बांबूची काठी व तिच्यावर एक रंगीबेरंगी साडी एक कडुलिंबाच्या झाडाची फांदी किंवा काही जण तिला डहाळी असे देखील म्हणतात आणि मग त्यावर तांब्याचा व चांदीचा कलश आणि त्याचबरोबर एक गाठी व एक फुलांचा हार आणि कलश हा त्या काठीमध्ये उलटा घातलेला असतो.

आणि सर्वच जण गुढी घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीत उभारतात आणि गुढी हि विजय,समृद्धी,आरोग्य व सुख-शांती याचे प्रतीक आहे. गुढी उभारल्याने घरात साकाराकमकतेची ऊर्जा प्राप्त होते.

गुढीपाडव्याची तयारी

गुढी पाडवा हा सण येण्याच्या एक दोन दिवस अगोदर घराची स्वच्छता केली जाते. अंगणात छानछान व आकर्षक रांगोळी काढली जाते. या दिवशी छोटं छोट्या मुलांना नवीन नवीन कपडे घेतले जातात. या दिवशी लोक पहाटे उठून अभ्यंगस्नान आणि देवपूजा करून गुढी उभारण्याच्या तयारीला लागतात. व कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन गुढी उभारतात. आणि त्या दिवशी प्रत्येकाच्या घरात पवित्रतेचे वातावरण असते.

गुढीपाडव्याचे पारंपरिक पदार्थ

गुढी पाडवा या सणाला काही पदार्थ बनवले जातात. त्यात मग पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, व पोळी-भाजी हे पदार्थ असतात व आपली आई हे पदार्थ तिच्या स्वत : च्या हाताने बनवते. आणि मग आपण सर्वजण ते पदार्थ एकदम मजेत व आनंदाने खातो. आपल्याला या पदार्थातून एक संदेश भेटतो तो म्हणजे कि आपल्या जीवनामध्ये सुख-दुःख समभावाने स्वीकारावे

सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व

गुढीपाडवा हा फक्त एक धार्मिक सण नाही तर हा एक सामाजिक एकतेचा उत्सव आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देतात. “नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा” असं म्हणत म्हणत मनातील प्रेम, भावना, आपुलकी व्यक्त केली जाते. आजच्या काळात देखील गुढी पाडवा हा सण मोठ्या उत्सहात सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपारिक वेशभूषा मध्ये साजरा केला जातो.

नववर्षाचा संकल्प

गुढीपाडवा हा सण म्हणजे कि मराठी व हिंदू नविन वर्षाची सुरुवात होय. या दिवशी अनेक लोक काही ना काही संकल्प करतात आणि ते म्हणजे वाईट सवयी सोडणे , चांगले गुण अंगीकारणे आणि समाजातील लोकांसाठी काहीतरी चांगले कार्य करणे. आणि याच बरोबर हा सण आपल्या शेतकऱ्यांसाठी देखील खुप महत्वाचा आहे. कारण या दिवसात नवीन शेती हंगामाची सुरुवात दर्शवतो.

आधुनिक काळातील गुढीपाडवा

Gudi padwa essay in marathi – आजच्या या सोशल मीडियाच्या जगात देखील गुढी पाडव्याला खूप महत्व आहे. व याच बरोबर आधुनिक जीवनशैलीतही गुढी पाडवा या सणाचे महत्व कमी झाले नाही. आता जरीही सोशल मीडियाच युग चालू असेल तरीही याच बरोबर आपले जीवन जरी वेगवान झाले असले तरी आपला समाज अजूनही आपल्या परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात.

खरं सांगायचं म्हणलं तर सोशल मीडिया मुळे आपले काम देखील खूप सोप्पे झाले आहे. कारण कोणताही सण असो काही हि असो सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. तरी सुद्धा काही लोक आपल्या कुटुंबासोबत गुढी पाडवा हा सण साजरा करणे. हि परंपरा टिकून आहे.

निष्कर्ष

गुढी पाडवा हा सण आपल्या भारत देश्याच्या मराठी संस्कृतीचा वारसा आणि आत्मा आहे. परंपरा व आधुनिकतेचा सुंदर संगम हा गुढीपाडवा हा सण आहे. आपल्या मराठी संस्कृतीत आणि भारत देशात जेवढे सण आपण साजरे करतो ते आपल्याला एक नवीन ऊर्जा निर्माण करतात. म्हणून हा गुढीपाडवा हा सण नवं जीवनाचा नववर्षाचा मंगल उत्सव आहे.

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.