My Favourite Hobby Drawing Essay In Marathi -

My Favourite Hobby Drawing Essay In Marathi – माझा आवडता छंद चित्रकला मराठी निबंध

प्रस्तावना

My Favourite Hobby Drawing Essay In Marathi – माणसाला कोणत्याही गोष्टीचा छंद असला पाहिजे कारण आजच्या या युगात छंदालाही फार महत्व आहे. कारण छंद म्हणजे एक अशी गोष्ट आहे कि ती माणसाला आनंद देणारी, याच बरोबर छंद हा माणसाचा तणाव कमी करतो. मानवाच्या जीवनात विकास करण्याच काम माणसात असलेला छंद करत असतो. आणि प्रत्येक माणसाचा एक वेगळा छंद असतो. कोणाला वाचण करणे गायन करणे नाहीतर कोणाला खेळ असा छंद असतो. मला हि खूप छंद आवडतात. पण माझा चित्रकला हा छंद सर्वात जास्त आवडतीचा आहे . कारण वेगवेगळ्या काल्पनांच्या साहाय्याने आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची कला म्हणजे चित्रकला.

चित्रकलेची ओळख

चित्रकला हि अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेली कला आहे. कारण आदिमानव देखील त्यांच्या गुहांच्या भिंतीवर सुंदर चित्रे काढायचे आणि त्यांच्या गुहांच्या भिंतीवर काढलेले चित्रे याचे उत्तम उदाहरण आहे. रेषा, आकार रंग आणि कल्पना या सर्व साहित्याच्या माध्यमातून चित्र तयार केले जाते. चित्रकलेमध्ये अनेक प्रकार आढाळतात निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, कल्पनाचित्रे, व इतरकाही. कोणताही चित्र असो त्यामागे कलाकाराचे विचार, भावना, कल्पना ह्या दडलेल्या असतात.

मला चित्रकलेची आवड कशी लागली

मी लहानपणापासूनच चित्र काढण्यात पटाईत होतो. व याच बरोबर लहानपणापासुन चित्र काढण्याची मला फार आवड होती. आणि शाळेत असताना चित्रकलेचा तास म्हणलं कि मज्जाच मज्जा सारांनी दिलेल्या विषयावर त्या टोकदार पेंसिल ने चित्र काढताना मला एक वेगळाच आनंद मिळायचा. मी सुरुवातीला खूप सोप्पी चित्रे काढली जसे कि झाडे, सूर्य, घर, नदी इत्यादी. आणि मग नंतर नंतर माझी आवड वाढू लागली आणि याच बरोबर माझी काल्पनाही वाढू लागली मग मी मोठं मोठी व कल्पक चित्रे काढू लागलो.

चित्रकलेसाठी लागणारी साधने

चित्र काढायला खूप काही साधने लागत नाही. फक्त एक पेंसिल, खोडरबर, पट्टी, कागद, कलर , ब्रश, इत्यादी साधने चित्र काढण्यासाठी लागतात. आता ते नवीन कलर देखील आलेत त्याला आपण पोस्टर कलर आणि पेंसिल कलर असे म्हणतो. योग्य साधने वापरली कि चित्र अधिक सुंदर आणि आकर्षक वाटत.

चित्रकलेचे प्रकार

चित्र हे अनेक प्रकारचे असतात. चित्रात फक्त एकच प्रकार नसून त्यामद्धे चार ते पाच प्रकार असतात. आता आपण ते पाहणार आहोत.

निसर्गचित्र :- निसर्गचित्र हे अतिशय सुंदर असत कारण या मद्धे डोंगर, नदी, झाडे, समुद्र, फुले हे सर्व कल्पनेनुसार दाखवली जातात.

व्यक्तिचित्रे :- या मध्ये फक्त माणसांची चित्रे दाखवली जातात. आणि त्याच बरोबर त्यांची कार्ये.

कल्पनाचित्रे :- जो चित्र काढतो त्याला आपण कलाकार म्हणतो आणि मग हे काल्पनाचित्र कलाकाराच्या कल्पनाशक्तीतूनच काढलं जात.

सामाजिक चित्रे :- हे चित्र आपल्याला संस्कृती, समस्या, समाजातील कार्ये हे सर्व दर्शवते.

मला विशेष म्हणजे निसर्गचित्र काढायला फार आवडतात कारण ते कल्पना करून रेषा ओढणे आणि ते पूर्ण झाल्यावर तो आनंद अगदी वेगळाच असतो.

चित्रकलेचे फायदे

चित्र काढल्यावरही अनेक फायदे होतात मी ते तुम्हाला सांगतो. आजच्या युगात काही काही मुलांना अभ्यास किंवा काम करण्याचा ताण होतो. माझं तुम्हाला एक सांगणं आहे तुम्हाला वाटतंय हि गोष्ट आता आपल्या लय डोक्याच्या वरून चाललीय तर मग त्या वेळात तुम्ही चित्र काढत बसले तर तुमचं मन शांत आणि प्रसंन्न होईल. चित्रकाढल्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळते व कल्पनाही वाढते. आणि आपल्या मनातील भावना शब्दांच्याऐवजी चित्रांच्या माध्यमातून व्यक्त करता येते.

चित्रकला आणि माझे जीवन

चित्रकला हा छंद माझ्या जीवनाचा आणि आनंदाचा स्रोत झाला आहे. मला जेव्हाही मोकळा वेळ असेल त्या वेळेत मी माझ्या कल्पनेतून एक सुंदर चित्र काढतो. काही काही वेळेला मी माझ्या मनातील भावना व मनातील अजून काही गोष्टी माझ्या चित्राच्या मदतीने व्यक्त करतो. मी एकदा चित्र काढायला लागलो कि मला वेळेचे भान राहत नाही. आणि माणसातील चित्रकला हा छंद माणसाला चांगले विचार करायला शिकवतो.

चित्रकलेतील यश आणि प्रोत्साहन

शाळेत मी जेव्हा पाचवी, सहावीच्या वर्गात होतो तेव्हा मी अनेक चित्रकला स्पर्धांमद्धे भाग घेतला आहे. आणि याच बरोबर काही स्पर्धांमद्धे क्रमांकही पटकावला आहे. व काही बक्षिसे पण मिळाली आहेत. मला माझ्या शाळेतील शिक्षकांनी चांगले मार्गदर्शन केले चांगलं प्रोत्साहन दिले. आणि पालकांनी व शिक्षकांनी आधार दिल्यामुळे माझी चित्रकलेतील आवड आणखी वाढली.

चित्रकला आणि भविष्य

येणाऱ्या काळात किंवा येणाऱ्या भविष्यात माझ्या डोक्यात एक विचार आहे कि चित्रकलेत अधिक यश मिळवणार आणखी प्राविण्य मिळवायचं हि माझी इच्छा आहे. माझ्या येणाऱ्या भविष्यात मी चित्रकला हा फक्त छंद न ठेवता तो माझ्या जीवनातील खूप महत्वाचा भाग बनवणार माझे या साठी प्रयत्न चालू आहे.

निष्कर्ष

चित्रकला हे अतिशय सुंदर माध्यम आहे भावना व्यक्त करण्याच आणि आत्ताच्या काळात प्रत्येक व्यक्तीने कोणताही एक छंद जोपासावा माणसांच्या अंगी छंद जर असेल तर त्याचे जीवन अधिक चांगले व सुंदर राहते. आणि शेवटी मी पण सांगतो की माझा आवडता छंद हा चित्रकलाच आहे.

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.