Mahatma Gandhi Marathi Essay

Mahatma Gandhi Marathi Essay – महात्मा गांधी मराठी निबंध

प्रस्तावना

Mahatma Gandhi Marathi Essay – महात्मा गांधी आपल्या भारताचे राष्ट्रपिता यामुळे संपूर्ण जग भरात आदराने ओळखले जातात. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते. त्यांनी मानवासाठी सत्य, अहिंसा, साधेपणा, नैतिकतेचा या चार गोष्टींचा आदर्श उभा केला. महात्मा गांधीजींनी केवळ आपल्या भारत देशाच्या स्वतंत्र लढ्याला नवे वळण दिले पण त्याच बरोबर अन्यायाविरुद्ध लढण्याचा अहिंसक मार्ग संपूर्ण जगासमोर मांडला. त्यांच्या या खडतर जीवनकार्यामुळे ते या जागतिक नेतृत्वाचे प्रतीक बनले. त्यांचे विचार त्यांचे कार्य त्याचा आजही तितकाच प्रभाव पडतो.

जन्म, बालपण आणि शिक्षण

Mahatma Gandhi Marathi Essay – महात्मा गांधी हे आपल्या भारताचे राष्ट्रपिता होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या शहरात झाला. लहानपणापासूनच कर्तव्यनिष्ठा खरबोलण्याची आणि सत्यवागण्याची आवड त्यांच्यात होती. महात्मा गांधी यांच्या जीवनातील कार्यामुळे ते जागतिक नेतृत्वाचे प्रतीक बनले.

महात्मा गांधीजींनी इंग्लंड मध्ये जाऊन वकिलीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रहाचे आंदोलन केलं. स्वच्छता पाळा,देशासाठी काम करा, चोरी करू नका अश्या खूप साऱ्या गोष्टी लोकांना त्यांनी समजावल्या आणि शिकविल्या स्वदेशी आंदोलन, सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन हे त्यांचे सगळ्यात प्रमुख आंदोलन होते.

दक्षिण आफ्रिकेतील अन्यायाविरुद्ध लढा

महात्मा गांधी यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर १८९३ मध्ये गांधीजी वकिली करण्यासाठी दक्षिण आफ्रिका येथे गेले. तिथे आपल्या भारतीयांवर चालू असलेला व होत असलेला अत्याचार आणि अन्याय पाहून त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. महात्मा गांधीजी यांना फक्त वर्णाच्या आधारे त्यांना रेल्वेच्या डब्यातून खाली उतरविण्यात आले. हा एक क्षण त्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला.

महात्मा गांधीजींनी तेथे राहून या आंदोलन करण्यास सुरुवात केली. अन्यायाविरुद्ध एकदम शांततेत कशे लढावे हा मार्ग त्यांनी जगासमोर ठेवला. या मुळे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाची उठावदार छाप पडली.

भारतात परतून स्वातंत्र्यलढ्यास नवी चालना

Mahatma Gandhi Marathi Essay – महात्मा गांधीजी १९१५ साली भारतात परतले. आपल्या भारत देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्तिथीचे त्यांनी ज्वलंत आणि चांगले निरीक्षण केले. आणि ब्रिटिशांविरुद्ध लढा संघटित पद्धतीने उभा केला.

महात्मा गांधीजींनी खाली दिलेली महत्त्वाची आंदोलने केली:

१) असहकार आंदोलन (१९२०)
महात्मा गांधीजींनी या आंदोलनात असे आवाहन केले कि ब्रिटिशांना कोणतेही सहकार्य न करण्याचा संकल्प हाती घेतला यात त्यांना शिक्षण, न्यायसंस्था त्यांच्या नोकऱ्या बहिष्कृत करण्याचे ठरवले.

२) स्वदेशी चळवळ
स्वदेशी चळवळ या आंदोलनात महात्मा गांधीजी यांनी स्थानिक उत्पादनांचा वापर वाढून परकीय वास्तूंना विरोध आणि चरखा हे त्यांचे प्रतीक बनले.

३) दांडी यात्रा आणि मिठाचा सत्याग्रह (१९३०)
मिठावरचा जो काही अन्यायकारक कर असतो त्या काराविरुद्ध केली गेलेली. २४० मैलांची ऐतिहासिक यात्रा

४) भारत छोडो आंदोलन (१९४२)
आणि शेवटचे आंदोलन म्हणजे भारत छोडो आंदोलन या आंदोलनात त्यांनी “करो या मरो” हि घोषणा देऊन ब्रिटिशांना भारत सोडण्याचा अंतिम इशारा दिला.

साधेपणा आणि आध्यात्मिकता

गांधीजी एवढे भारताचे राष्ट्रपिता होते परंतु त्यांचे राहणीमान खूप साधे, संयमी आणि शिस्तबद्ध पद्धतीने ते जीवन जगत होते. त्यांचे अन्न,वस्त्र,निवारा वर्तन हे सर्व भारतीय संस्कृतीचे प्रतिक होते. महात्मा गांधीजी त्यांचा जो चरख्यावर सूत कातणे, आणि स्वतःही साधेच वस्त्र वापरतात. आणि त्यांचा सत्य आणि अहिंसेवरील अढळ विश्वास आणि हेच त्यांचे ओळख चिंन्हे बनले.

दु:खद निधन

Mahatma Gandhi Marathi Essay – आणि मग एक दिवस आसा आला कि ३० जानेवारी १९४८ रोजी ते दिल्ली येथे एका प्रार्थनेसाठी जात असताना नथुराम गोडसे यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि महात्मा गांधी यांचे निधन झाले. त्या क्षणालाही त्यांच्या ओठावर “हे राम!” हा शब्द होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण जग दु:खद आणि शोकाकुल झाले.

उपसंहार

महात्मा गांधीजी हे नाव म्हणजे सत्य, प्रेरणा, अहिंसा व नैतिकता आणि मानवतेचे भव्य रूप होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढे पण संदेश दिले. ते केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक होते. आधुनिक जगात हिंसा मतभेद आणि अन्याय वाढलेल्या. काळात गांधींचा विचार अधिकच महत्त्वाचा ठरतो. महात्मा गांधीजींच्या विचारांचे अनुसरून करणारा भारतीय हा खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचे वारसदार ठरेल.

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.