Teachers Day Speech In Marathi

Teachers Day Speech In Marathi – शिक्षक दिनानिमित्त सुंदर भाषण मराठी

Teachers Day Speech In Marathi – नमस्कार मित्रांनो मी या शाळेचा विद्यार्थी मिलिंद मिसाळ आणि मी आज आपणा सर्वांसमोर शिक्षकांविषयी दोन शब्द बोलणार आहे. माननीय प्रमुख पाहुणे, शिक्षकवृंद, उपस्थित पालकगण माझ्या प्रिय मित्र – मैत्रिणींनो आपणा सर्वांना माझा नमस्कार आणि शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !

आज आपण सर्वजण येथे अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रमासाठी क्षणासाठी येथे जमलो आहोत. – ५ सप्टेंबर हा दिवस का साजरा केला जातो तर भारताचे माजी राष्ट्रपती शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचा आज जन्म झाला होता. आपण त्यांचे व्यक्तिमत्त्व विचार आणि शिक्षणावरील प्रेम हे आपल्या भारतातल्या विद्यार्थ्यांना कळावे. यामुळेच त्यांच्या जन्मदिन संपूर्ण भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो.

शिक्षक म्हणजे काय

शिक्षक म्हणजे फक्त पुस्तकातील धडे शिकविणारा व्यक्ती नाही. तर शिक्षक हा आपल्या आयुष्याचा खूप मोठा मार्गदर्शक किंवा व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या आई वडिलानंतर आपल्या आयुष्यात आपल्याला चांगले व्यक्तिमत्त्व चांगला प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणजे आपले शिक्षक.
ते आपल्याला फक्त गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी शिकवतातच पण त्याच बरोबर ते आपल्याला लिहायला, वाचायला, आणि समाजात कस जगावं कस वावरावं आणि आपल्यावर आलेल्या संकटांचा कश्या प्रकारे सामना करावा हे देखील आपल्याला शिकवतात.

बर असं पण नाही कि प्रत्येक दिवस सारखेच असतात. एखाद्या दिवशी आपण अभ्यासात मागे पडतो किंवा खेळात मागे पडतो तर कधी आपल्याकडून काही गोष्टीही कधी नकळत चुकीच्या घडतात. नाहीतर आपल्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात. मग अश्या वेळेत फक्त आपल्याला पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न फक्त शिक्षकच करतात.

शिक्षकांचे महत्त्व

Teachers Day Speech In Marathi – आपण आपल्या संस्कृतीत किंवा आपल्या संपूर्ण महाराष्ट्र्रात सर्वच जण आपापल्या गुरूला अत्यंत उच्च दर्जाचे स्थान देतो. “गुरू ब्रह्मा, गुरू विष्णू, गुरू देवो महेश्वरा” हा मंत्र आपल्या संस्कृती मध्ये गुरूंना उद्देशून आहे. कारण शिक्षक आपल्याला ज्ञान देतात, विचार देतात, आपल्याला दोन चार चांगल्या गोष्टी शिकवतात आणि आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी प्रकाश देतात.खरंतर आपल्या महाराष्ट्रात किंवा समाजात कित्तेक डॉक्टर,इंजिनीअर,वकील,खेळाडू, शास्त्रज्ञ परंतु ते स्वतःही मेहनत करतात दिवस रात्र चांगला अभ्यास करतात. आणि मग कुठेतरी अशी उच्च दर्जाची पदवी मिळवतात. प्रत्येकाच्या मागे शिक्षकांचीच भूमिका असते.

आणि खरंतर सांगायचं म्हंटल तर आजच्या डिजिटल युगात माहिती मिळवणे देखील खूप सोप्पे झाले आहे. कारण मोबाईल ने आपले जगणे खूप सोपं झालं आहे. त्यापेक्षाही माहिती आणि ज्ञान यांच्यामधला फरक समजावून देणारे आपले शिक्षकच इंटरनेट आहेत. आपल्या शाळेत शिक्षकच आपल्याला शिकवतात कि काय केल्याने काय होते.

शिक्षकांची निष्ठा आणि त्याग

Teachers Day Speech In Marathi – शिक्षकांच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचा विद्यार्थी कुठेतरी चांगल्या पदावर असणे. ते आपल्यासाठी दररोज किती मेहनत घेतात हे आपण कधी लक्ष्यात घेतो का.
ते केवळ वर्गातल्या ४५ मिनिटांसाठी तयारी करत नाहीत; तर ते आपल्या भविष्यासाठी दिवस रात्र परिश्रम घेतात.

आणि विध्यार्थी मित्रांनो अनेक शिक्षक अशे पण असतात कि ते आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या विद्यार्थ्यांना जास्त वेळ देतात. कारण कि त्यांना आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवायचं असत अनेक शिक्षक त्यांच्या समस्या बाजूला ठेऊन किंवा त्यागोष्टींवर पडदा टाकून आपल्या स्वतःच्या चेहऱ्यावर हसू ठेऊन वर्गात येतात. फक्त एवढ्या कारणासाठी कि आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम व कोणताही धडा मागे राहू नये.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल काय करावे ?

Teachers Day Speech In Marathi – आपण जरीही विध्यार्थी असलो तरी पण आपण शिक्षकांना सर्वात मोठी भेटवस्तू देऊ शकतो ती म्हणजे – आपला प्रामाणिक प्रयत्न.
आपण शिक्षकांच्या सूचना किंवा त्यांचे बोलणे ध्यान देऊन ऐकले पाहिजे. आपण शिक्षकांचा सन्मान, आदर केला पाहिजे. आपण देखील प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे. आणि आपण आपल्या आयुष्यात यश संपादन करून त्यांचे नाव उज्ज्वल करणे – हीच खरी गुरुदक्षिणा आहे.

आपण शिक्षकांना फुल देतो, कार्ड बनवतो अनेक कार्यक्रम साजरे करतो हे देखील सुंदर आहेच पण त्यांच्यासाठी सर्वात मोठा अभिमान म्हणजे आपला विद्यार्थी चांगला माणूस घडला पाहिजे.

शेवटचे विचार

या अतिशय आणि महत्वाच्या क्षणाला मी सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो कि – आपण आहात म्हणूनच आम्ही आहोत. तुम्ही आमच्या आयुष्यात जे काही गुण, मूल्य, संस्कार, पेरले यांची फुले आम्ही आयुष्यभर फुलवू आज आम्ही जे काही स्वप्न पाहत अहो ते आमचे स्वप्न पूर्ण करण्याचा आत्मविश्वास देखील तुम्हीच दिला. तुमच्या प्रत्येक शिकवणीचे उपकार आणि ऋण आयुष्यभर राहील ते आम्ही कधीच फेडू शकणार नाही. तुम्ही जी काही ज्ञानाची देणगी आम्हाला दिली आहे तिने आम्ही समाजात प्रकाश पसरवू आणि योग्य त्या ठिकाणी पोहोचू .

आम्हाला या शाळेत आपल्यासारखे शिक्षक लाभले हीच आमची खरी संपत्ती आहे.

धन्यवाद, जय हिंद जय भारत !

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.