My School Essay in Marathi – माझी शाळा निबंध मराठी

My School Essay – ‘ ही आवडते मज मनापासूनि शाळा लाविते लळा जसा माऊली बाळा ‘ शाळेत मुले खऱ्या अर्थाने घडवली जातात. शाळा हे संस्कारांचे केंद्रस्थान आहे. मुलाला खेळायला, नाचायला, हसायला हीच शाळा शिकवते. शाळेतील गुरुजीही मुलांना हासून, हसवून गोष्टी सांगून ज्ञान देत असतात.

मला माझी शाळा खूप आवडते – i like my school because

My School Essay – माझ्या शाळेचे नाव ‘सेंट जोसेफस् हायस्कुल’ आहे. ती विक्रोळी पश्चिमेस रेल्वेस्थानकाजवळ आहे. ती खूप मोठी व चार मजल्याची इमारत आहे. आमच्या हेडसरांचे नाव स्टिफन्स असून फादर परेरा मार्गदर्शक आहेत. माझ्या शाळेत शिशू, प्राथमिक व माध्यमिक विभाग आहेत. जवळजवळ ५० गुरुजी व बाई आम्हाला ज्ञान देतात. शाळेची सफाई व इतर कामासाठी १० शिपाई आहेत. ते शाळेच्या साफसफाई व सजावटीसाठी अहोरात्र झटत असतात.

माझ्या शाळेत ज्ञानाबरोबरच सुसंस्कारही केले जातात. कलेला प्रोत्साहन देण्यासाठी बालदिन, स्वातंत्र्यदिन, शिक्षकदिन या दिवशी निरनिराळे कार्यक्रम दाखवले जातात. माझ्या शाळेत भव्य ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक शाळा तसेच मनोरंजनासाठी दुरदर्शन वगैरे आहे. शरीर मजबूत होण्यासाठी फुटबॉल, हॉकी, क्रिकेट व कवायती होतात. खेळायला व अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिस व गोष्टींची पुस्तके देतात ज्यातून आपले सामान्यज्ञान वाढण्यास मदत होते. मला माझे गुरुजन व शाळेविषयी अभिमान आहे. माझ्या शाळेत निरनिराळ्या स्पर्धा घेऊन मुलांमधील निरनिराळ्या कलागुणांना वाव दिला जातो.

My School Essay in Marathi

‘धन्य धन्य ती शाळा, जी देशाकरिता तयार करिते बाळा’

अशी ही माझी आदर्श शाळा देशात आदर्श नागरिक घडवून निरनिराळ्या क्षेत्रात मुलांना तयार करते. आणि आपले राष्ट्र संपन्न आणि समृध्द बनविण्याठी सिंहाचा वाटा उचलते.

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.