Savitribai Phule Essay In Marathi

Savitribai Phule Essay In Marathi – स्त्री शिक्षणाची जननी – सावित्रीबाई फुले

प्रस्तावना

Savitribai Phule Essay In Marathi – आपल्या भारतीय समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता हा विचार जरी सर्वमान्य झाला असेल तरीसुद्धा त्याची पायाभरणी १९व्या शतकात दूरदृष्टी असलेल्या समाजसुधारकांनी केली. त्या अग्रगण्यांमध्ये सावित्रीबाई फुले हे नाव देखील खूप सर्वोच्च आहे. स्त्रीशिक्षणाची बीजे पेरून आपल्या भारत देशाच्या समाजात क्रांती घडवणाऱ्या, जातिव्यवस्तेच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांना एक नवा प्रकाश देण्याऱ्या सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने भारतरत्नां सामान व्यक्तिमत्त्व होत्या.

बालपण व आयुष्य

सावित्रीबाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले ह्या शूद्र-कुनबी समाजात जन्मलेल्या असल्यामुळे त्यांना शिक्षणाची संधी मिळणे अशक्य मानले गेले. सावित्रीबाई फुले यांचा विवाह लहान वयातच १८४० रोजी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. विवाह झाल्यानंतर ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जीवनामध्ये शिक्षणाची ओढ निर्माण करून दिली. व पुढे सावित्रीबाईंना इंग्रजी, मराठी, गणित इत्यादी विषयाचे शिक्षण पूर्ण केले. हा बदल महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडून आणला.

स्त्री शिक्षणाची क्रांती

मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना

Savitribai Phule Essay In Marathi – पुण्यातील भिंगारवाडा येथे १८४८ साली सावित्रीबाई आणि जोतीराव यांनी आपल्या भारत देशाची मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाला प्रचंड मोठा विरोध होता. सावित्रीबाई शाळेत जात असताना समाजातील लोक त्यांच्या अंगावर दगड, चिखल, विटा फेकल्या जात असत. पण सावित्रीबाई खंबीरपणे उभा राहिल्या. सावित्रीबाईंच्या खांद्यावर पुस्तकांनी भरलेली पिशवी होती. आणि त्याच पिशवी मध्ये एक दुसरी साडी – कारण लोक चिखल , माती , दगड फेकत असे त्यामुळे त्यांना साडी बदलावी लागत असे !

शिक्षिकेची भूमिका

सावित्रीबाई फुले ह्या आपल्या भारतीय इतिहासातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका मानल्या जात होत्या. त्यांनी शिक्षणात अजून नवं नवीन कल्पना घडून आणल्या. मुलींच्या सर्व व्यक्तिमत्त्वाचा विकास, वाचन,, लेखन, स्वच्छता, शिस्त सावित्रीबाईंनी मुलींच्या या गोष्टींवर विशेष भर दिला.

समाजसुधारणेतील त्यांचे योगदान

महिला आणि दलितांच्या हक्कांसाठी लढा

Savitribai Phule Essay In Marathi – ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बालविवाह, जातीभेद, रूढी, परंपरा, मुलींवर जो तिरस्कार होतोय या इत्यादी गोष्टी विषयी या दोघांनी या विरोधात आवाज उठवला. त्या दोन व्यक्तींनी विधवा महिलांसाठी बालगृह सुरु केले. अवैध गर्भधारणेमुळे समाजाने नाकारलेल्या मुलांना वाचवण्यासाठी सत्यशोधक समाज या अंतर्गत त्यांनी अपत्यगृह व शिशुगृह स्थापन केले. आणि हे काम करणे म्हणजे त्या काळातील अतिशय धाडसी पाऊल होते.

कष्टकरी व शेतकरी वर्गाची बाजू

सावित्रीबाई यांनी शेती विरुद्ध किव्वा शेतकरी समाजावर होणारे जे अन्यायाविरुद्ध आंदोलन आहे या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. त्यांनी शेती विषयी भाष्य करून एक कविता लिहून आपल्या समाजाला जागे केले.

लेखनकार्य

सावित्रीबाई फुले ह्या एक खूप चांगल्या लेखिका आणि कवयित्री होत्या. त्यांच्या बावनकशी, काव्यफुले, रत्नमाला यांसारख्या कृतींमधून सामाजिक विचार अन्यायावरील टीका आणि प्रभोनात्मक संदेश दिसून येतो.

प्लेगच्या साथीतील मानवतावादी कार्य

पुण्यामध्ये प्लेगची साथ अतिशय भयानक प्रकारे १८९७ साली पसरली. आणि त्या काळामध्ये खूप लोक रुग्णांनाची मदत करायला घाबरत होते. पण सावित्रीबाई अजिबात न डगमगता पुढे येऊन रुग्णांनाची सेवा करू लागल्या. ज्या रुग्णांना प्लेगची लागण झाली त्यांना दवाखान्यात पोहचवताना सावित्रीबाई यांना प्लेगची लागण झाली. आणि प्लेग या साथीने सावित्रीबाई फुले

महामारीतील सेवा

Savitribai Phule Essay In Marathi – १८९७ मध्ये आपल्या भारत देशामध्ये प्लेगची साथ पसरली आणि ती हि लय घातक होती. आणि तिच्या पासून एक संसर्गजन्य आजार होत होता. त्या वेळी या साथीने त्या इतिहासात अनेकवेळा आहाकार माजवला. त्यावेळी सावित्रीबाई फुले आपल्या भारतातल्या लोकांच्या सेवेसाठी झोकून देऊन काम करत होत्या. आणि त्या साथीला “ब्लॅक डेथ” या नावाने ओळखले जात होते. या “ब्लॅक डेथ” या साथीत व या महामारीत हजारो, लाखो लोकांचा मृत्यू झाला.

व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा आढावा

१] दृढ निश्चय – सावित्रीबाई यांना खूप लोकांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी विरोध केला पण त्यांनी तो ध्यास कधीच सोडला नाही.

२] अखंड परिश्रम – सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी अखंड परिश्रम घेतले आणि ते म्हणजे शिक्षण, समाजसुधारणा, वाचन, लेखन, सेवा इत्यादी.

३] समतावादी विचारसरणी – म्हणजे कि सावित्रीबाईंनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन व मानवतेवर विश्वास व त्याच बरोबर मुलीना शाळेचे ज्ञान दिले.

४] समाजातील वंचितांसाठी करुणा – म्हणजे कि आपल्या भारतातल्या समाजात असे अनेक लोक होते कि विधवा, दलित, अनाथ, गरजू अथवा अश्या लोकांच्या हक्कासाठी सावित्रीबाईंनी खूप मोठा संघर्ष केलाय. आणि आजच्या काळात पण अजून अशे लोक आहेत कि ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप गरीब आणि बिकट आहे. पण अश्या लोकांसाठी आज कोणालाही वेळ राहिला नाही. कारण आज काल लोक फक्त आपल्या हिताचंच बगतात.

आजचा सावित्रीबाई विचार

आज आपल्या भारत देशात मुलींची साक्षरता फार वाढली आणि त्याच बरोबर मुली देखील अनेक क्षेत्रात पुढे जाऊ लागल्या आहेत. मुली देखील फार यशस्वी होऊ लागल्या आहेत. याचे श्रेय देखील सावित्रीबाई व त्यांच्या विचारसरणीला जाते.

marathiessayonline हा एक दर्जेदार मराठी ब्लॉग आहे जिथे तुम्हाला निबंध, भाषणे, महान व्यक्तींची जीवनचरित्रे आणि विविध विषयांवरील माहिती लेख वाचायला मिळतात. आमचा उद्देश वाचकांना दर्जेदार, सोप्या आणि उपयुक्त मराठी लेखनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे.